भावाने रंग बदलला, सरडा रंग बदलतो : संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा

Santosh Gaikwad August 16, 2024 04:37 PM



मुंबई :  महाविकास आघाडीच्य मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी  महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला आहे.  संजय राऊतांनी    नाव  न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.  सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी  रंग बदलला आता पिंक झाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.  तुम्ही किती तोडा फोडा आमची एकी तुटणार नाही असे देखील संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी  रंग बदलला आता पिंक झाले आहेत.  सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही.  पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे.  केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा... एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवाच तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे.  महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी करेल त्यांना रस्त्यावर ठोकयचे.  ५० खोके एकदम ओके, रस्त्यात दिसले तर ठोकेचं ठोके आता यांना विधानसभेमध्ये जाऊ द्यायचा नाही.विधानसभा निवडणुका जिंकल्यावर रस्त्यावर दिसले नाही पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.