रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महायुती सरकारने सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा - रामदास आठवले

Santosh Gaikwad September 04, 2024 05:57 PM


मुंबई  - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विश्वास मी जिंकला आल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले आहे.त्यामुळे देशभर रिपब्लिकन पक्ष वाढत आहे.रिपब्लिकन पक्षात दलितांसोबत सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात जोडले जात आहेत.ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी करून लोकांना जोडून पक्षाचे बळ वाढवावे लागेल त्यानंतर स्वबळाची भाषा करावी लागेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शनमुखानंद सभागृह येथे मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आठवले बोलत होते. माझ्यासोबत प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज आहे. वर्षोनुवर्षे त्यांना काही मिळाले नाही तरी माझ्या सोबत आहेत. राज्यात महायुती सरकार शासन आपल्या दारी आणि लाडकी बहिण योजनेचे कार्यक्रम घेते तेंव्हा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना डावलले जाते.त्यांना सन्मानाने या शासकीय कार्यक्रमांना निमंत्रित केले जात नाही.  रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटक पक्ष आहे.त्यामुळे महायुती सरकारने रिपब्लिकन कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समिती जिल्हा तालुका कमिटी राज्यस्तरीय महांमंडळांवर सत्तेत सहभाग द्यावा आणि सन्मान द्यावा अशी सूचना आठवले यांनी केली.


यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांच्यावर कविता सादर करून देशात सर्वात मोठे दलितांचे आंबेडकरी जनतेचे नेते रामदास आठवले हेच एकमेव असल्याचे गौरवोद्गार काढले.त्यांचा आदर्श घेऊन रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्या भागात काम करावे म्हणजे रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढेल आणि सत्तेचा वाटा उमेदवारी मागायची वेळ येणार नाहीतर मित्रपक्ष स्वतःहून रिपब्लिकन कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास तयार होईल असे मत  दरेकर यांनी व्यक्त केले.

रिपब्लिकन पक्षाची ताकद प्रचंड आहे.मात्र निवडणुकीत ताकद दाखवली पाहिजे.रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी मधून रिपब्लिकन पक्ष 111 जागांवर लढला मात्र रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडून आला नाही हे लक्षात ठेवा .स्वबळाची भाषा करताना रिडालोस चा अनुभव लक्षात ठेवा असे संगुन रिपब्लिकन ची ताकद आहे ताकद वाढावा आणि डिमांडर होऊ नका कमांडर व्हा असा सल्ला माजी मंत्री महादेव जानकर यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी विचारमंचावर भाजप प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर ; रासप चे माजी मंत्री महादेव जानकर ; सौ सीमाताई आठवले; अध्यक्ष स्थानी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; माजी मंत्री अविनाश महातेकर; रिपाइं चे महाराष्ट्र अध्यक्ष राजा सरवदे; राज्यसरचिटणीस गौतम सोनवणे;मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; सूत्रसंचालन विवेक पवार यांनी केले.सुनील बन्सी मोरे; दयाळ बहादुर,सुरेश बारशिंग, श्रीकांत भालेराव आशाताई लांडगे शीलाताई गांगुर्डे;अनिल गांगुर्डे; अभाया सोनवणे; फुलाबाई सोनवणे; उषा रामलू;सौ नैनाताई  वैराट; प्रकाश जाधव; रमेश गायकवाड; संजय डोळसे; संजय पवार ; अजित रणदिवे साधू कटके; सोहेल शेख , रवी गायकवाड, डी एम चव्हाण, ऋषी माळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते