जनरेटिव एआयच्या माध्यमातून प्रवासासाठीच्या आरक्षणाला नव्याने आकार देण्यासाठी मेकमायट्रिपने केला मायक्रोसॉफ्टशी सहयोग
Santosh Sakpal
May 09, 2023 10:35 PM
प्लॅटफॉर्म भारतभरात सर्वसमावेशक आणि उपलब्ध करून देण्यासाठी पायाभरणी
मे २०२३: एक महत्त्वाचे पाऊल उचलत, मेकमायट्रिपने मायक्रोसॉफ्टशी सहयोग केला आहे. भारतीय भाषांमध्ये ध्वनीवर आधारित बुकिंगची सुविधा देऊन प्रवासाचे नियोजन अधिक समावेशक करण्यासाठी व सर्वांच्या आवाक्यात आणण्यासाठी हा सहयोग करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युर ओपन एआय सेवा आणि अझ्युर कॉग्निटिव सेवांचे पाठबळ लाभलेले हे नवीन इन-प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान वापरकर्त्यांशी संवाद साधून, त्यांच्या प्राधान्यक्रमांच्या आधारे व्यक्तिनिरूप प्रवासविषयक शिफारशी करणार आहे; प्रसंग, बजेट, कृती प्राधान्य, प्रवासाचा काळ आदी परिवर्तनीय माहितीच्या आधारे हॉलिडे पॅकेजेस विकसित करणार आहे; आणि हे हॉलिडे पॅकेजेस बुक करण्यातही मदत करणार आहे. यामुळे ऑनलाइन प्रवासाची परिसंस्था देशातील प्रत्येक स्तरासाठी व लोकसंख्या वर्गासाठी खुली होणार आहे. सध्या या एकात्मिकरणाचे बिटा स्वरूप विमान प्रवास व सुटीचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ध्वनी सहाय्य बुकिंग प्रवाहाच्या पुढील टप्प्यात अन्य वाहतूक उत्पादने समाविष्ट केली जातील. ही सुविधा प्लॅटफॉर्मच्या लँडिग पेजवरच एम्बेड करण्यात आली आहे आणि एका क्लिकमध्ये ती सक्रिय केली जाऊ शकेल.“आम्ही ई-कॉमर्स, प्रवास आणि तंत्रज्ञान यांना छेद देणारी उत्पादने प्रथमच बाजारपेठेत आणली आहेत आणि भाषा, साक्षरता, गुंतागूंतीच्या अॅप्समधील असमर्थता, शारीरिक विकलांगता अशा सर्व अडथळ्यांवर मात करणारी सुविधा शोधून काढल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे मेकमायट्रिपचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ राजेश मागोव म्हणाले. “मायक्रोसॉफ्टशी आम्ही केलेल्या सहयोगातून विकसित झालेल्या या जनरेटिव एआय एकात्मीकरणात सुलभ दृश्यसंकेत व भारतातील स्थानिक भाषांतील ध्वनीआधारित सूचनांचा समावेश आहे. यामुळे भविष्यकाळातील प्रवासासाठी केल्या जाणाऱ्या आरक्षणाचे चित्रच पालटून जाणार आहे.”
मेकमायट्रिपच्या या नवीन उत्पादनात एआय व मशिन लर्निंगची शक्ती वापरून प्रवासाशी निगडित सर्वव्यापी उत्पादने तयार करण्यात आली आहे. वापराच्या कोणत्याही प्रकारात किंवा स्थितीत ही उत्पादने प्रभावी ठरतात. मायक्रोसॉफ्टची विशाल भाषा प्रारूपे आणि भारतीय भाषांची वाणी प्रारूपे ह्यांना मेकमायट्रिपच्या नैसर्गिक भाषा समजण्याच्या क्षमतेची आणि प्रवास क्षेत्रातील काँटेण्टची जोड मिळाल्यामुळे वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पाया तयार झाला आहे. याद्वारे ग्राहक कोणत्याही भारतीय भाषेत प्लॅटफॉर्मशी संवाद साधू शकतो.
मेकमायट्रिपचे समूह मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय मोहन म्हणाले, “ग्राहकांच्या खऱ्याखुऱ्या समस्या समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या आमच्या तत्त्वाशी सुसंगती राखत, आमच्या प्लॅटफॉर्मवर क्रांतिकारी बदल घडवून आणू शकलो याचा आम्हाला आनंद वाटतो. या नवीन सुविधेमुळे आमच्या वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला होईल आणि आमचा प्लॅटफॉर्म अधिक समावेशक, उपलब्ध होण्याजोगा आणि नेव्हिगेट करण्यास सोपा होईल. बिटा टप्प्यात आम्हाला वापरकर्त्यांच्या वर्तनाचे सर्व प्रकार समजून घेऊन त्यातून शिकण्याची संधी मिळेल. त्या संधीचा उपयोग करून आम्ही पूर्ण क्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे आम्ही आता ही सुविधा अत्यंत नियंत्रित पद्धतीने आमच्या ग्राहकांच्या एका उपसंचापर्यंत पोहोचवत आहोत."
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या डिजिटल नेटिव्ह्ज विभागाच्या कार्यकारी संचालक संगीता बावी म्हणाल्या, “मेकमायट्रिप ही प्रवास उद्योगातील आद्य कंपनी आहे आणि ऑनलाइन उद्योग क्षेत्रातील एआयवर आधारित नवोन्मेष व ग्राहक संवादाचे पुढील टप्पे निश्चित करण्यासाठी आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे हा आमचा सन्मान आहे. मेकमायट्रिपच्या कौशल्यांची सांगड मायक्रोसॉफ्टच्या, मायक्रोसॉफ्ट अॅझ्युर ओपनएआय सेवेसारख्या, एआय क्षमतांशी घातली गेल्यामुळे भारतभरातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक समावेशक व आवाक्यातील होईल आणि विश्वास व सुरक्षितता हा याचा गाभा असेल.”
अॅझ्युर ओपनएआय सेवेच्या जीपीटी तंत्रज्ञानाचे पाठबळ लाभलेला इंट्युइटिव (अंत:प्रेरणाधारित) इंटरफेस वापरकर्त्यांच्या विशिष्ट गरजांचे विश्लेषण करेल आणि हजारो पर्यायांमधून चाळणी लावून पर्यायांची शिफारस करेल, हॉलिडे पॅकेजेस व्यक्तिनुरूप करून देईल तसेच बुकही करून देईल. एका वेळखाऊ प्रक्रियेचे रूपांतर ह्यामुळे झटपट व विनाकटकट अनुभवात होईल. यामध्ये हॉटेल परीक्षणांचा (रिव्ह्यूज) सारांश दिला जाईल, प्रवाशांचे अनोखे अनुभव टिपले जातील. हे अनुभव समूह विशिष्ट म्हणजेच एकट्या प्रवाशाचे, व्यावसायिक प्रवाशाचे, जोडप्यांचे तसेच कुटुंबांचे असतील. यामुळे अनेकविध रिव्ह्यूज न चाळताही व्यक्तिनुरूप व महत्त्वपूर्ण माहिती वापरकर्त्याला प्राप्त होऊन हॉटेल बुक करण्याचा अनुभव अधिक चांगला होऊ शकेल.
Santosh Sakpal
November 17, 2024
Santosh Sakpal
November 12, 2024
Santosh Sakpal
November 06, 2024
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023