VIRAL NEWS : लाइटहाऊस जर्नलिझमला इंटरनेटवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना आढळला. हा व्हिडीओ अनेकांच्या भुवया उंचावत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने थक्क करणारा हा व्हिडीओ कदाचित तुम्हीही आतापर्यंत पाहिला असेलच. यामध्ये एक रोबोट आणि माणूस यांच्यातील टेबल टेनिसचा खेळ दिसतो. यामध्ये रोबोट माणसाला हरवताना ज्या कमाल अविर्भावात आणि एकदम कूल अंदाजात शॉट खेळतो ते पाहून सर्वच थक्क होत आहेत. हा व्हिडीओ पाहायला कितीही रंजक वाटत असला तरी यातील एक बाब मात्र अनेकांकडून मिस झाली आहे. ती काय हे आता आपण जाणून घेऊया…
ट्विटर यूजर Anjana ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.