स्वीडनमध्ये थाटामाटात रंगला मंगळागौरीचा कार्यक्रम

Santosh Gaikwad August 25, 2024 06:48 PM


स्वीडन : गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळ यांच्या वतीने स्वीडन मध्ये मोठ्या थाटामाटात मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांना भरपूर खेळ खेळून धम्माल केली.

गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळाने २०२३ पासून स्वीडन येथे या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने यंदाच्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिलांनी नऊवारी साडी परिधान करून पारंपारिक वेशेत नटून थटून सहभागी झाल्या होत्या. झिम्मा, फुगडी खेळत महिलांनी  धम्माल मस्ती केली असे प्रणाली मानकर पतके यांनी सांगितले.
****