ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन : मराठी सिने सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार गमावला
Santosh Gaikwad
August 10, 2024 11:25 AM
मुंबई : मराठी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेता विजय कदम यांचं आज १० ऑगस्ट रोजी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झाल ते ६७ वर्षाचे होते . विजय कदम यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेले दीड वर्षांपासून ते कर्क रोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने मराठी सिने सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. 'टूरटूर', 'सही दे सही', 'विच्छा माझी पुरी करा', 'पप्पा सांगा कुणाचे' अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. ' चष्मेबहाद्दर, 'पोलीस लाईन' , ' हळद रुसली कुंकू हसलं ' व ' आम्ही दोघ राजा राणी' हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि एक मुलगा आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंधेरी ओशिवरा येथील समशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.