अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. मराठीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केल्यानंतर त्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसल्या. करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर त्या अमेरिकेला स्थायिक झाल्या. त्यांनी हा निर्णय का घेतला आहे, ते त्यांनी सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात सांगितले होते.
‘अशी ही बनवाबनवी’, ‘कळत नकळत’, ‘मीरा का मोहन’, ‘वजीर’ अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत त्या आघाडीच्या अभिनेत्री बनल्या होत्या. करिअरच्या शिखरावर पोहोचलेल्या असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “माझं लग्न होईपर्यंत मी माझ्या करिअरमध्ये यश मिळवलं होतं. पण मला तितकंच समरस होऊन संसारही करायचा होता. लग्नानंतर जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी सिनेसृष्टीत पुनरागमन करणार नाही हे मी ठरवलं होतं.”
पुढे त्या म्हणाल्या, “लग्नानंतर करिअरमधून ब्रेक घेणं हा मी घेतलेला निर्णय होता. अमेरिकेला गेल्यावर मी तिथे फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जे मला करायला आवडतं त्यात मी नवीन शिक्षण घेतलं. त्यामुळे मी माझं करिअर जितकं एन्जॉय करत केलं तितकीच मी संसारातही रमले.”
अश्विनी भावे लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. केल्या काही वर्षांत त्या ‘मांजा’, ‘ध्यानीमनी’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आजही त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात.
मराठी चित्रपटसृष्टी गाजवून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेल्या आणि तेथेही सशक्त अभिनयामुळे गाजलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये अश्विनी भावे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत मात्र त्यांची नाळ अजूनही देशाशी जोडली गेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आपल्या उपक्रमांबद्दल माहिती देत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अश्विनी भावे यांनी नुकतीच गुहागरला भेट दिली आहे. एका चित्रीकरणाच्या निमित्ताने त्या गुहागरला गेल्या होत्या. तेव्हा गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्या असं म्हणतात “कोकणातील माझी सर्वात आवडती जागा म्हणजे गुहागर, एका शूटिंगच्या निमित्ताने मी इथे आलेय, आज मोकळा दिवस आहे कित्येक वर्षांनी मी गुहागरच्या बीचवर आलेय, इथे कोणी नाहीये, निरव शांतता आहे. सूर्यास्त बसून एन्जॉय करता येतोय हे केवढं सुख आहे.” व्हिडीओमध्ये त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील काही क्षण टिपले आहेत.