उजासचा मासिक पाळी आरोग्य उपक्रमात शेकडो विद्यार्थिनींचा सहभाग
चिंचवड : भारतात मासिक पाळी आजही निषिद्ध मानली जात असून मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण मासिक पाळी ही महिलाधील नैसर्गिक शारीरिक अवस्था असली तरी यातून अनेक गंभीर आजार निर्माण होतात. अशा प्रकारचे आजार आणि महिलांच्या समस्या हे राष्ट्राच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात असे मत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट संचालित उजास सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अद्वेतेशा बिर्ला यांनी व्यक्त केले. चिंचवड ताथवडे येथील नरसिंग विद्यालय येथे आयोजित मासिक पाळी आरोग्य जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी मासिक पाळी जनजागृती बाबत शाळेतील भिंतीवर चित्र साकारून कलेच्या माध्यमातून मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान याप्रसंगी अद्वैतेशा बिर्ला पुढे म्हणाल्या की, “मी अनेक मुलींशी संवाद साधला आहे. ज्ञान आणि जागरुकतेच्या अभावामुळे ते ज्या मानसिक तणावातून गेल्याबद्दल मुलींनी मला सांगितले. म्हणून मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता तसेच त्यांचे पीरियड्स किंवा त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत उजास ने निराकरण करण्यासाठी कार्य हाती घेतले असल्याचे सांगत "पुढे महाराष्ट्रातील आणखी २० शाळांमध्ये भिंतीवरील चीत्रांद्वरे मासिक पाळी जनजागृती उपक्रम राबविणार असल्याचे माहिती बिर्ला यांनी दिली. अंदाजे १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की , आजही ७१ टक्के मुलींना मासिक पाळी येईपर्यंत माहिती नसते आणि ५० टक्के पेक्षा जास्त मुलींना मासिक पाळीच्या योग्य स्वच्छतेबद्दल माहिती नसते परिणामी ११ ते १४ वयोगटातील २.३ कोटी मुली दरवर्षी शाळा सोडतात त्यामुळे उजासने १ लाख १५ हजार ३४७ पेक्षा जास्त किशोरवयीन मुली आणि मुलांसाठी जनजागृती मोहीम सुरू केली केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ३ हजार ५४१ पेक्षा कार्यशाळा आयोजित केल्या आणि ५१२ शाळांमध्ये आजवर ही मोहीम राबविली गेली. या वर्षभरात महाराष्ट्रातील १४ जिल्हे व २ लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उजासचे उद्दिष्ट आहे आहे आशा अद्वेतेशा बिर्ला यांनी व्यक्त केली.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहकार्य
अलीकडेच उजासने बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे १०० महिलांना स्वयं-मदत प्रशिक्षण देणार्या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी संधी निर्माण करून कापडी पॅड तयार करण्यासाठी गट तयार करणे हा उपक्रम हाती घेतला आहे.