52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळलं. हे विमान कोसळून जो अपघात झाला त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक माणूस जखमी झाला आहे.
ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारतीय वायुदलाचं हे विमान हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये कोसळलं. हे विमान ज्या घरावर कोसळलं त्यातल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. वैमानिक आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले आहेत.