मिरे ऍसेट म्युच्यूअल फंडाने आणला मिरे ऍसेट मल्टीकॅप फंड
Santosh Sakpal
July 28, 2023 06:03 PM
(मुदतमुक्त श्रेणीतील समभाग योजनेची लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक)
मुंबई, : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या मिरे ऍसेट म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त श्रेणीतील मिरे ऍसेट मल्टीकॅप फंड आणत असल्याची घोषणा केली आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारी ही समभाग योजना आहे.
फंडाचा एनएफओ 28 जुलै 2023 रोजी गुंतवणूकीसाठी खुला होत आहे आणि येत्या 11 ऑगस्ट 2023 ला बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन श्री अंकित जैन करतील. फंडासाठी पायाभूत इंडेक्स निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 ट्राय हा राहणार आहे.
फंडातील किमान प्रारंभिक गुंतवणूक पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत असेल.
प्रमुख ठळक वैशिष्टे:
• -पाच वर्षांपेक्षा अधिक गुंतवणूकीचा कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचा हा एक पर्याय आहे. आपल्या इक्विटी पोर्टफोलिओत बाजार भांडवली मूल्यामध्ये विविधता आणू पाहत असलेले किंवा गुंतवणूक योजनांची संख्या मर्यादित राखू इच्छिणाऱ्यांसाठी हा फंड योग्य पर्याय. कारण त्यातून बाजाराच्या संपूर्ण भांडवली मूल्याच्या श्रेणीत प्रवेशाची संधी मिळते.
• -प्रत्येक प्रकारात किमान २५ टक्के आणि कमाल 50 टक्के वाटप, त्यामुळे विविध प्रकारांत समसमान सहभाग निश्चित होतो.
• -लार्ज कॅप गुंतवणूक ही बाजार भांडवलीमूल्यानुसार आघाडीच्या १०० समभागांमध्ये केली जाईल. या प्रकाराच्या समभागांतील समाविष्ट कंपन्यांनी व्यवसायात स्थिरतेची पातळी गाठलेली आणि प्रामुख्याने प्रबळ कंपन्यांचा समावेश असेल. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत जोखीम आणि अस्थिरता हे दोन्ही अतिशय अल्प प्रमाणात राहते.
• -मिड कॅपमध्ये भांडवली बाजारमूल्यानुसारच्या क्रमवारीत १०१ ते २५० दरम्यानच्या म्हणजेच दीडशे समभागांचा समावेश राहणार आहे. या समभागांत वाजवी मूल्यांकनांसह मोठ्या प्रमाणावर उदयास येत असलेल्या व्यवसायांचा समावेश होतो.
• -स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये भांडवली बाजारमूल्यानुसार 251 आणि त्यापुढील समभागांचा समावेश असून त्यात नुकत्याच सुरु झालेल्या आणि क्षमता प्रकटीकरणासह व्यवसायात वाढीला प्रचंड वाव असलेल्या कपन्यांचा समावेश आहे. या समभागामध्ये जोखीम अधिक असली तरी त्यांच्यात अल्फा प्रकारचा परतावा मिळवून देण्याची प्रचंड क्षमता आहे.
• -उर्वरित 25 टक्के गुंतवणूक ही अतिशय कौशल्यपुर्ण राहणार असून विविध प्रकारच्या भांडवली बाजारमूल्यात लवचिक पध्दतीने गुंतवणूक करत संधीचा लाभ घेतला जाणार आहे.
मिरे ऍसेट मल्टिकॅप फंड भांडवलीकरण आणि क्षेत्रनिरपेक्ष असल्याने गुंतवणूकदारांना उत्कृष्टतेचे नानाविध लाभ तसेच अर्थव्यवस्थेतील तांत्रिक बदलांची प्रचिती देणाऱ्या समभाग आणि क्षेत्रांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा अनुभव प्रदान करतो. ज्या गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात विस्तारायचा नाही, परंतु सर्व क्षेत्रातील सर्वोत्तम गोष्टींचा लाभ मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी हा फंड उत्तम संधी आहे.
मिरे ऍसेट मल्टीकॅप फंडाचे फंड व्यवस्थापक अंकित जैन म्हणाले, “सुरुवातीपासूनच, गुंतवणुक धोरणानुसार आमच्या गुंतवणूकदारांचा परतावा अधिकाधिक उंचावण्यास सक्षम करणारे विविध पर्याय सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीला अनेक योजनांची जोड न देता त्यांची गुंतवणूक संपूर्ण बाजारमूल्यश्रेणीत विस्तारित करण्यास गुंतवणूकदारांना सक्षम करण्याच्या तत्वाचे पालन मिरे ऍसेटचा हा मल्टीकॅप फंड करतो. मिरेच्या मल्टीकॅप फंडाच्या लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणूकीमुळे संधी आणि जोखमीत वैविध्य येते आणि त्यामुळे जोखीम आणि लाभ संतुलित करणारा तो एक लवचिक पर्याय बनतो.”
श्री. जैन पुढे पुढे म्हणाले, "जागतिक आर्थिक वातावरणात अस्थितरता असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेने प्रभावी वाढीचे मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. मिरे ऍसेट मल्टिकॅप फंड आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध क्षेत्रातील रोमांचक सकारात्मक घडामोडींचा लाभ घेणे आणि ते मिळवून देणे ही दोन्ही उद्दिष्ट ठेवतो."
मिरे ऍसेट मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांना नियमित योजना आणि थेट योजना या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. एनएफओनंतर, किमान एक हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक करता येईल.