आमदार गोळीबार प्रकरण : मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ज्युपिटर रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

Santosh Gaikwad February 03, 2024 04:14 PM



ठाणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रूग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन  महेश गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


 कठोर कारवाई व्हावी : श्रीकांत शिंदे 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे सुध्दा होते. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या शरीरातून सहा गोळया बाहेर काढल्या आहेत त्यांच्यावर तज्ञ डॉक्टारांची टीम उपचार करीत आहेत. तसेच या प्रकरणाचे सीसी टिव्ही फुटेज समोर आहेत त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कठेार करावाई करावी अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.