मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार - रामदास आठवले

Santosh Gaikwad May 24, 2024 03:15 PM


मुंबई दि.24 - रिपब्लीकन पक्ष देशभर भाजप एन डी ए ला मजबूतीने साथ देत आहे.उत्तर भारत ; दक्षिण भारत आणि संपूर्ण देशात मोदी सरकार बद्दल चांगले वातावरण आहे.जनतेची चांगली साथ मोदींना मिळत आहे. त्यामुळे येत्या 4 जून ला लोकसभेचा निकाल लागणार असून त्यात मोदींच्या चारशे पार च्या नाऱ्यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे.काँग्रेस आणि इंडी आघाडी ने अनेक अफवा आणि दुषप्रचार केला असला तरी त्या काँग्रेस च्या अफवांचा चक्काचूर होणार आहे.नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नक्की होतील असा विश्वास आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

 मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत . रामदास आठवले बोलत होते. देशभरातील 22 राज्यांचा दौरा एन डी ए चे स्टार प्रचारक ना.रामदास आठवलेंनी लोकसभा निवडणुकीत केला आहे. देशभर भाजप एन डी ए आघाडीतील उमेदवारांचा प्रचार केला आहे .नुकताच  उत्तर प्रदेश हरयाणा पंजाब दिल्लीचा दौरा ना.रामदास आठवलेंनी केला असून आज त्याबाबत ची  माहिती पत्रकार परिषदेत .रामदास आठवलेंनी दिली.

उत्तर प्रदेशात 75 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकणार आहे.उत्तर प्रदेशात भाजप ला राष्ट्रीय लोकदल: अपना दल ; रजभर पार्टी; निषाद पार्टी चा मोठा पाठिंबा राहिला आहे.रिपब्लिकन पक्षाची मोठी साथ भाजप ला मिळाली आहे. उत्तर प्रदेशात बीएसपीचा जनाधार कमी होत असून बीएसपीतून कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन पक्षात प्रवेश मोठ्या प्रमाणांत होत आहे.आगामी काळात उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल असा विश्वास. रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

काँग्रेस आणि इंडी आघाडी ने सत्तेत येण्याची अनेक सप्न पहिली आहेत.चार जून नंतर मोदी जातील असे काँग्रेसच्या  राहुल गांधीना स्वप्न पडत आहे.त्यांनी सत्तेत आल्यास महिलांच्या बँक खात्यात खटाखट खटाखट 1 लाख रुपये टाकू अशी खोटी आशा दिली आहे.मात्र काँग्रेस चे सरकार काही येत नाही.पण ते खटाखट पैसे टाकत असतील तर आम्ही महिलांना सांगू तुम्ही पटापट पटापट  ते पैसे घ्या. राहुल गांधीना माझे आवाहन आहे की त्यांचे सरकार येणार नाही मात्र सरकार आले नाही तरी त्यांनी कोट्यावधी महिलांच्या खात्यावर 1 लाख रुपये खटाखट टाकावेत असे सांगत रामदास आठवलेंनी राहुल गांधी आणि काँग्रेस इंडी आघाडीच्या सत्ता मिळण्याचा स्वप्नांचा जनता चक्काचूर करणार असल्याचा पुनरुच्चार केला.

काँग्रेस आणि इंडी आघाडी ने  दलित मुस्लिम जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.अनेक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र काँग्रेसला त्यात यश मिळणार नाही. महामानव 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून इतिहास घडविला आहे.ते या देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे.मात्र तरीही संविधान बदलले जाईल अशी खोटी अफवा पसरवण्याचा आणि दलित जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेस इंडी आघाडीचा प्रयत्न फसला आहे.संविधान बदलण्याचा आरोप हा बिनबुडाचा आरोप आहे हे सत्य दलित जनतेला कळले असून संविधानाला कोणताही धोका नसल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस इंडी आघाडीच्या खोट्या अफवांना भिक न घालता दलित मुस्लिम ओबीसी जनतेने एन डी ए सोबत महायुती सोबत राहावे असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी केले.

मोदींनी देशातील 140 कोटी जनता आपला परिवार असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे ते सर्वांचे आहेत.मोदी सरकार हे मुस्लिमविरोधी नाही.मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचे चुकीचे घटनाबाह्य आश्वासन काँग्रेस देऊन घटनाविरोधी कृती करीत आहे.धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नये ही संविधानाची भूमिका आहे. संविधानाच्या भुमिकेविरुद्ध काँग्रेस जात आहे.असा आरोप ना.रामदास आठवलेंनी केला.

दलित आदिवासी या घटकांना मागासवर्गीय जाती जमाती म्हणून घटनेने आरक्षण दिले आहे.मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मागास जाती म्हणून ओबीसींना आरक्षण देण्यात आले आहे.ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम जातींना आरक्षण मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नव्याने सुरू केल्या आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय 
ई ड बल्यू एस चे 10 टक्के आरक्षण देशभरात लागू असून त्याचा लाभ मुस्लिम समाजही घेत आहे.मोदी सरकार ने सुरू केलेल्या जन धन योजना; मुद्रा योजना; उज्ज्वला योजना; आयुष्यमान भारत योजना आणि मोफत अन्नधान्य योजना अशा अनेक योजनांचा देशभरातील मुस्लिमांनाही लाभ मिळाला आहे.त्यामुळे मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नये ही राज्यघटनेची भूमिका आहे.हिंदू मुस्लिम बौध्द ख्रिश्चन शीख कोणत्याही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये ही संविधानाची भूमिका आहे तीच भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका आहे. त्यामुळे मोदी हे संविधनिक भूमिका मांडत आहेत ते मुस्लिम विरोधी नाहीत असे ना. रामदास आठवलेंनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य घटनेला ; आरक्षणाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही ; काँग्रेस आणि इंडी आघाडीतील पक्ष जनाधार संपत चालल्यामुळे धोक्यात आले आहेत.मोदींच्या नेतृत्वात भाजप आणि एन डी ए आघाडी मजबूत आहे.मोदी सरकार च्या काळात भारत देशाची अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आलेली आहे.आत्मनिर्भर भारत; उत्कृष्ट रस्तेविकास; विमानतळांचे जागतिक दर्जाचे आधुनिकीकरण ; रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत.त्यातून कोट्यावधी लोकांना रोजगार मिळत आहेत असे ना. रामदास आठवले म्हणाले.

काँग्रेस आणि इंडी आघाडीला बहुमत मिळणार नाही.त्यांच्या कडे प्रधानमंत्री पदाचा एकही उमेदवार नाही.त्यासाठी त्यांच्यात ऐक्य नाही.फुटीच्या उंबरठ्यावर इंडी आघाडी असून चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर इंडी आघाडीची माळ फुटून विखरणार आहे. येत्या चार जून ला मोदी सरकार स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे असा  विश्वास  रामदास आठवलेंनी व्यक्त केला.