52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
नवी दिल्ली : शिवसेना लोकसभा गटनेतेपदी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी श्रीरंग बारणे यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याला अनुमोदन दिलं.
दरम्यान लोकसभा गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले की पक्षाच्या सर्व खासदारांनी मला लोकसभा संसदीय पक्षाचा नेता म्हणून माझी निवड केली यासाठी मी सर्वाँचे आभार मानतो संसदेत सर्वांना सोबत घेऊन चांगल काम करू असे शिंदे म्हणाले.