सूर्यकुमार-नेहलची अर्धशतके
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 83 धावा केल्या. त्यानंतर नेहल वढेराने 52, ईशान किशनने 42 धावा केल्या. बंगळुरूकडून वानिंदू हसरंगा आणि विजय कुमार वैशाखने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
मुंबईचा डाव
मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 199 धावा करत मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना मुंबईला ओपनर ईशान किशन आणि रोहित शर्माने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात ईशान किशनला 42 धावांवर बाद करत हसरंगाने ही जोडी फोडली. नंतर हसरंगाने त्याच षटकात रोहित शर्मालाही 7 धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेराने डाव सावरत तिसऱ्या गड्यासाठी 140 धावांची भागीदारी केली. सोळाव्या षटकात सूर्यकुमार यादवला 83 धावांवर बाद करत विजय कुमार वैशाखने ही जोडी फोडली. सूर्यकुमारची विकेट घेतल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने टिम डेव्हिडलाही शून्यावर बाद केले. अखेर नेहल आणि कॅमेरून ग्रीनने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले.
अशा पडल्या मुंबईच्या विकेट
फाफ-मॅक्सवेलची अर्धशतके
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 199 धावा करत मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले. बंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर फाफ डु प्लेसिसने 65, दिनेश कार्तिकने 30, तर केदार जाधव आणि वानिंदू हसरंगाने प्रत्येकी 12 धावा केल्या. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फने 3 विकेट घेतल्या. तर कॅमेरून ग्रीन, क्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बंगळुरूचा डाव
प्रथम फंलदाजीला आलेल्या बंगळुरूची खराब सुरूवात झाली. त्यांचा ओपनर विराट कोहली पहिल्याच षटकात 1 धावेवर आऊट झाला. जेसन बेहरनडॉर्फने त्याची विकेट घेतली. त्यानंतर बेहरनडॉर्फनेच तिसऱ्या षटकात अनुज रावतला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने डाव सावरत तिसऱ्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात मॅक्सवेलला 68 धावांवर बाद करत बेहरनडॉर्फने ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात कुमार कार्तिकेयने महिपाल लोमरोरला 1 धावेवर बाद केले. तर पुढच्याच षटकात फाफ डु प्लेसिसला कॅमेरून ग्रीनने 65 धावांवर बाद केले. यानंतर दिनेश कार्तिक आणि केदार जाधवने डाव पुढे नेला. एकोणिसाव्या षटकात क्रिस जॉर्डनने दिनेश कार्तिकला 30 धावांवर बाद केले.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
दोन्ही संघांचे प्लेइंग 11...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.
इम्पॅक्ट प्लेयर्स : केदार जाधव, मायकल ब्रेसवेल, सुयश प्रभदेसाई, कर्ण शर्मा आणि शहबाज अहमद.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय आणि जेसन बेहरनडॉर्फ.
इम्पॅक्ट प्लेयर : रमनदीप सिंह, ट्रिस्टर्न स्टब्स, विष्णू विनोद, संदीप वॉरियर्स आणि राघव गोयल.