मुंबईकरांना मानलं : दुसऱ्या माळ्यावरून कपाट खाली उतरवायला केला भन्नाट जुगाड

Santosh Sakpal July 27, 2023 09:29 PM

मुंबई : मुंबईकरांच्या जुगाडाला जगात तोड नाही असं म्हणतात आणि ते एका पद्धतीने खरंच आहे. कारण धो धो पडणारा पाऊस असो, लोकलची तुफान गर्दी असो, प्रत्येक मिनिटाला बदलणारे वाहतुकीचे मार्ग व नियम असो प्रत्येक गोष्टीत मुंबईकर स्वतःला सामावून घेऊ शकतो. हेच जुगाडू मुंबईकर कधी कधी कोणालाच विश्वास बसणार नाही असे काम झटक्यात करून मोकळे होतात. असाच एक जुगाड सध्या आमची मुंबई या इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल होत आहे. तब्बल २० हजाराहून अधिक लाईक्स असणाऱ्या या व्हिडिओला पाहून मुंबईकर भौतिकशास्त्र म्हणजेच Physics मध्ये किती हुशार आहेत याचा अंदाज येत असल्याचे सुद्धा अनेकजण म्हणत आहेत.

एक दोन मजल्यांच्या चाळींची घरं असणाऱ्या मुंबईत काही मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये आलिशान घरं असतात. या घरांमधील फर्निचर पाहून डोळे दिपले जातात. पण हे फर्निचर इतक्या वर कसं नेलं जातं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? अलीकडे फर्निचर व अन्य वस्तू सुद्धा काही पार्टसमध्ये बनवून मग मोठमोठ्या लिफ्ट्स मधून नेल्या जातात पण एक दोन माळ्याच्या बिल्डिंगमध्ये ना लिफ्ट असते ना उचलून नेण्यासाठी जिन्यांमधून तेवढी जागा. मग नेमकी ही भलीमोठी कपाटं, सोफा वर किंवा खाली कसा नेला जातो. हेच काम करण्यासाठी या व्हिडिओमधील हुशार मंडळींना भन्नाट जुगाड केला आहे. चला पाहूया..