गुड न्यूज : अवघ्या दोन महिन्यात मुंब्रा कौसा बायपास वाहतुकीसाठी खुला !

Santosh Gaikwad June 18, 2023 03:40 PM


मुंबइ्र : मुंब्रा-कौसा बाहयवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अवघ्या दोन महिन्यात करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग खुला झाल्याने जेएनपीटी येथून तसेच उत्तर भारतातून येणारी छोटी वाहने तसेच जडअवजड वाहने ठाणे शहरात न येता मुंब्रा बायपास मार्गाने मार्गस्थ होतील. त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला.

रेल्वे उड्डाणपुलाच्या लांबीमध्ये दरवर्षी अती अवजड वाहतूकीमुळे खड्डे पडुन वाहतुकीस अडथळा होत असल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. या कामसाठी ४० कोटी रूपये मंजूर करण्यात आले हेाते. सार्वजनिक बांधकाम (पीडब्लुडी) विभागामार्फत ०५ एप्रिल २०२३ पासून मुंब्रा बाय पास रोड बंद करण्यात आला होता. हा रस्ता बंद असताना विविध पर्यायी मार्गाने सर्व वाहनचालकांना जावे लागत होते. विशेष म्हणजे रेल्वे उड्डाणपुलाच्या लांबीमध्ये कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्यासाठी Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.  अगदी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरीकांची होणारी गैरसाय व वाहतुकीचा खोळंबा टळणार आहे.

रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील बाजूस डेक स्लॅब व गर्डरला पॉलिमर मॉस्टर, इपॉक्सी ग्राउटींग, फायर रेसिस्टेंट प्लास्टर आणि अँटी कार्बोनेशन रंगकाम हि कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच पुलाचे सर्व एकस्पानशन जॉईंट्स व रेल्वे ऑब्लिगेटरी गाळयाचे सर्व बेअरींग बदलण्यात आलेले आहेत. मुंब्रा - कौसा बाहयवळणाच्या संपुर्ण लांबीमध्ये खराब असलेले काँक्रिट पॅनल्स काढून नव्याने मुंब्रा-व काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. जुने मोडकळीस आलेले कॅशबॅरियर काढून नव्याने कॅशबॅरियर बसविण्यात आलेले आहे. मान्सुनपुर्व गटारांची व मो-यांची साफसफाई करण्यात आलेली आहे. मध्य दुभाजक दुरूस्ती, रंगकाम व त्यामध्ये वृक्षारोपन करण्यात आलेले आहे. संरक्षक भिंतींचे रंगकाम व धर्मोप्लास्टीक रंगकाम करून संपुर्ण लांबीमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे.

मुंब्रा-कौसा बाहयवळण रस्त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद करावयाचे असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री  रवींद्र चव्हाण यांनी सदरचे काम २ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता  शरद राजभोज, अधिक्षक अभियंता विलास कांबळे, कार्यकारी अभियंता  सत्यनारायण कांबळे, उपविभागीय अभियंता  अमोल वळवी, शाखा अभियंता  प्रसाद सनगर, कनिष्ठ अभियंता विकास जाधव व . राहूल कडपाते तसेच ठेकेदार मे. एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांनी विशेष परिश्रम घेऊन अवघ्या २ महिन्यांमध्ये सदरचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
------------

सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे अंतर्गत पहिल्यांदाच Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC ) या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाच्या आधारे उड्डाणपूलावर उच्चश्रेणी काँक्रिटने ओव्हरले करणेचे काम यश्वस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष सहकार्याने, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  रवींद्रजी चव्हाण साहेब  यांच्या मार्गदर्शनाने तसेच, कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्राचे खासदार  श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.  ( विलास कांबळे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे)
---------------