नाशिक जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार, 69 नवजात बालकं असलेल्या कक्षात शॉर्ट सर्किट!

Santosh Sakpal April 03, 2025 08:03 PM

नाशिक :नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याचा प्रकार समोर आलायं. ज्या कक्षात हे शॉर्ट सर्किट झालं तिथे 69 नवजात बालक होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले.