नेस्‍टेराने मुंबईतील प्रख्‍यात गणेश मंडळांना केले सुशोभित*

Santosh Sakpal September 22, 2024 09:27 PM


 ठाणे दि. २२ (प्रतिनिधी) : नेस्‍टेरा या के. के. बिर्ला ग्रुपचा भाग सतलेज टेक्‍सटाइल्‍स अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज लि.च्‍या प्रिमिअम होम फर्निशिंग्‍ज ब्रँडला मुंबईतील दोन सर्वात प्रतिष्ठित गणेश मंडळ: चिंचपोकळी सार्वजनिक उत्‍सव मंडळ आणि लालबागचा राजा यांच्‍यासोबत सहयोगाची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटत आहे. या सहयोगामधून कला, भक्‍ती व सांस्‍कृतिक अभिमानाचे संयोजन असलेल्‍या लक्‍झरी डिझाइनच्‍या दृष्टिकोनातून अद्भुतरित्‍या भारतीय परंपरांना साजरे करण्‍याप्रती नेस्‍टेराची कटिबद्धता दिसून आली. 

लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांच्‍या विचारांवर आधारित १०५ वर्षांपूर्वी स्‍थापना करण्‍यात आलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्‍सव मंडळाने मुंबईतील सामाजिक आणि सांस्‍कृतिक परंपरा जपली आहे. लालबागचा राजा १९३४ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेले मुंबईतील सर्वात प्रख्‍यात गणेश मंडळ आहे. भव्‍य साजरीकरण, आकर्षक सजावट आणि गणपती बाप्‍पाच्‍या मोठ्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्‍या या दोन्‍ही मंडळांना गणेशोत्‍सवादरम्‍यान हजारो भक्‍तांनी भेट दिली. निसर्गाचे सौंदर्य व वैविध्‍यपूर्ण संस्‍कृतींमधून प्रेरित नेस्‍टेराचे डिझाइन तत्त्व या मंडळांच्‍या आध्‍यात्मिक आभाशी सुसंगत होते. 


नेस्‍टेराचा सहयोग प्रायोजकत्‍वापलीकडे गेला. यामध्‍ये डिझाइनच्‍या क्षमतेच्‍या माध्‍यमातून सामुदायिक भावना निर्माण करण्‍याला महत्त्व देण्‍यात आले. प्रीमियम साहित्‍यासह डिझाइन करण्‍यात आलेले आकर्षक फॅब्रिक्‍स आणि बारीक-सारीक गोष्‍टींकडे लक्ष देत लक्षवेधक इन्‍स्‍टॉलेशन्‍स तयार करण्‍यात आले होते. प्रीमियम आकर्षकता आणि सांस्‍कृतिक अभिमानाच्‍या या अद्वितीय एकत्रिकरणाने भक्‍ती व कलात्‍मक अभिव्‍यक्‍तीची विशिष्‍ट गाथा सांगितली. 

स्‍टायलिश व विशेष सजावटीसाठी प्रसिद्ध नेस्‍टेराने आपल्‍या सिग्‍नेचर तत्त्वासह गणेशोत्‍सव साजरीकरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली.