गोदरेज इंडस्ट्रीत, भामला फाउंडेशन आणि हंगामा म्युझिक प्लॅस्टिक प्रदुषणाविरूद्ध लढण्यासाठी एकत्र, टिक टिक प्लॅस्टिक २.० हे नवे गाणे लाँच
Santosh Sakpal
June 05, 2023 03:17 PM
मुंबई, ३१ मे २०२३ – गोदरेज इंडस्ट्रीजने प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी #BeatPlasticPollution नावाचे कॅम्पेन सुरू केले असून त्याचाच भाग म्हणून एक अनोखा सांगीतिक व्हिडिओ तयार केला आहे. भामला फाउंडेशन आणि हंगामा यांच्याबरोबर भागिदारीमध्ये हे गाणे तयार करण्यात आले आहे. ‘टिक टॉक प्लॅस्टिक २.०’ असे नाव असलेल्या या गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे, तर संगीत प्रसिद्ध कलाकार शान यांनी दिले आहे. शामक दावर यांच्या लक्षवेधी कोरिओग्राफीने हे गाणे सजवण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिन २०२३ साजरा करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या या गाण्यात संगीताच्या माध्यमातून शाश्वत उपाययोजना शोधण्याची प्रेरणा देण्यात आली आहे.
‘टिक टॉक प्लॅस्टिक २.०’ या गाण्यात सेलिब्रेटीजची मांदियाळी पाहायला मिळणार असून त्यात विद्या बालन, गुलजार, आलिया भट्ट, आयुषमान खुराना, शामक दावर, गुनीत मोंगा, शान, रिकी केज, अर्मान मलिक, नीती मोहन, रवीना टंडन, स्टेबिन बेन, सोनू निगम, जन्नत झुबैर व फैसू यांचा समावेश आहे.
या कॅम्पेनच्या दुसऱ्या टप्प्यात ४ जून रोजी ग्रीन राइड सायक्लॉथॉन – ‘पेडल फॉर द प्लॅनेट’चे आयोजन करण्यात आले आहे. या राइडच्या माध्यमातून नागरिकांना पृथ्वीसाठी शाश्वत बदल करण्याचे आवाहन केले जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनी मुख्य कार्यक्रम होणार असून त्यात वेगवेगळे कलाकार, निर्णयकर्ते, पर्यावरणवादी एकाच व्यासपीठावर येत प्लॅस्टिक प्रदुषणाच्या समस्येवर चर्चा करतील. या समस्येवर कोणत्या निर्णयांच्या माध्यमातून तोडगा काढता येईल याविषयीही चर्चा केली जाणार आहे.
या एकत्रित प्रयत्नांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल (भारत सरकार) मंत्रालय, जी२० इंडिया प्रेसिडेन्सी आणि संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण उपक्रमाचा पाठिंबा लाभला आहे. एकत्रित प्रयत्नांतून जागतिक पातळीवर प्लॅस्टिक प्रदुषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यावर विचार केला जाणार आहे. गोदरेज मॅजिक आणि गोदरेज ला अफेयरसारखे प्रसिद्ध ब्रँड्सही या प्रभावी उपक्रमाला पाठिंबा देत आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘टिक टॉक प्लॅस्टिक २.०’ सादर करत प्लॅस्टिक प्रदुषणाच्या गंभीर समस्येवर उपाय काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याची आठवण आम्हाला करून द्यायची आहे. प्लॅस्टिक प्रदूषण कमी करून आपल्या पृथ्वीवर होणारे त्याचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी शाश्वत भविष्याची निर्मिती करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
गोदरेज अग्रोव्हेटचे कार्यकारी संचालक बुरजिस गोदरेज म्हणाले, ‘टिक टिक प्लॅस्टिक गाण्यासाठी भामला फाउंडेशन आणि हंगामा म्युझिक यांच्याशी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. प्लॅस्टिक प्रदुषणाच्या समस्येविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल (भारत सरकार) मंत्रालय, जी२० इंडिया प्रेसिडेन्सी आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमासारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या पाठिंब्याच्या मदतीने भविष्य प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मॅजिक हँडवॉशसारख्या शाश्वत उत्पादनाच्या मदतीने शाश्वत भविष्याप्रती असलेली बांधिलकी आम्ही जपत आहोत. ९३ टक्के हँडवॉश पाण्याचे असतात, त्यामुळे ते ९३ टक्के पाण्याची वाहतूक होते, तर मॅजिक हँडवॉशमध्ये केवळ कॉन्स्नट्रेटची वाहतूक केली जाते व पर्यायाने पृथ्वीचे संरक्षण केले जाते. २०२२ मध्ये भारतात ७२ दशलक्ष लीटर हँडवॉश वापरले गेले. मॅजिक नसते, तर यामुळे ६७ दशलक्ष लीटर पाण्याची वाहतूक झाली असती. मॅजिकमुळे ही आकडेवारी ६२ दशलक्ष लीटर्सपर्यंत मर्यादित राहिली. केवळ एकट्या मॅजिकमुळे ५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत झाली.’
या सहकार्याविषयी भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला म्हणाले, ‘गोदरेजसारख्या पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या ब्रँडसह सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. गोदरेजच्या सामाजिक उपक्रमांचे आणि शाश्वततेप्रती त्यांच्या बांधिलकीचे आम्हाला कायमच कौतुक वाटत आले आहे. जागतिक पर्यावरण दिन २०२३ च्या निमित्ताने प्लॅस्टिक प्रदुषणाच्या समस्येविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या टिक टिक प्लॅस्टिक या आमच्या उपक्रमाला पाठिंबा देत त्यांनी पर्यावरण संवर्धनाबद्दल वाटणारी कळकळ दाखवू दिली आहे. एकत्रितपणे आम्ही जागरूकता निर्माण करण्यासाठी, कृतीला चालना देण्यासाठी आणि प्लॅस्टिक प्रदुषणाच्या समस्येशी लढताना प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी उत्सुक आहोत. या मौल्यवान सहकार्यासाठी आम्ही गोदरेजचे आभारी आहोत. एकत्रितपणे आम्ही हरित आणि स्वच्छ पृथ्वीसाठी यशस्वी कॅम्पेन राबवू असा विश्वास वाटतो.’
बॉलिवूड हंगामाचे संस्थापक नीरज रॉय म्हणाले, ‘जागतिक पर्यावरण दिन २०२३ च्या निमित्ताने टिक टॉक प्लॅस्टिक कॅम्पेनमध्ये सहभागी होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचा प्लॅटफॉर्म या नात्याने सकारात्मक बदल घडवून आणण्यातील मीडियाच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे. वितरण चॅनेल्सच्या माध्यमातून प्लॅस्टिक प्रदुषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शाश्वत भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अशा परिणामकारक उपक्रमांना पाठिंबा देण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे.’
जागतिक पर्यावरण दिनी जागतिक कॅम्पेनच्या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रेटीज आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहाणार असून हा कार्यक्रम कार्टर रोड अम्फीथिएटर, बांद्रा (पश्चिम) येथे होणार आहे.