देशाला आज नवीन संसद मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, विरोधी पक्षांचा बहिष्कार !
Santosh Gaikwad
May 28, 2023 07:32 AM
दिल्ली : देशाच्या नवीन संसद भवनाचे आज रविवारी २८ मे २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन करण्यात येणार नसल्याने 21 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
आज सकाळी ७ वाजल्यापासूनच या भव्य सोहळ्याला सुरूवात झाली. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार होणार आहे. दोन टप्प्यात उद्घाटन सोहळा होणार असून, पहिल्या टप्प्यात 7.15 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत पूजा होईल.त्यानंतर 11.30 वाजल्यापासून उद्घाटन समारंभ होणार आहे
या विरोधी पक्षांचा बहिष्कार....
काँग्रेससह टीएमसी, डीएमके, आप, राष्ट्रवादी पार्टी, ठाकरे गट, समजावादी पार्टी, आरजेडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा,नॅ शनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि) राष्ट्रीय लोकदल, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, व्हिसीके, एमडीएके आदींनी बहिष्कार टाकला आहे
हे पक्ष सहभागी होणार...
या सोहळ्याला भाजप, शिवसेना (शिंदे), नॅशनल पीपुल्स पार्टी मेघालय, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा, जन नायक पार्टी एआईडीएमके, आईएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिजो नॅशनल फ्रंट, तमिल मानिला काँग्रेस, आयटीएफटी, बोडो पीपुल्स पार्टी पट्टाली मक्कल काची, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, अपना दल, असम गण परिषद, लोक जनशक्ति पार्टी (पासवान), बीजेडी, बीएसपी, टीडीपी, वायएसआरपीसी, अकाली दल आणि जेडीएस आदी पक्ष उपस्थित राहणार आहेत.