निसानची मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशन ७.३९ लाख रुपये किमतीला
Santosh Sakpal
May 26, 2023 10:36 PM
▪ जपानी रंगभूमी आणि त्यातील बोलक्या सांगीतिक विषयवस्तूंपासून प्रेरित
▪ ६ महत्त्वाच्या सुधारणांच्या माध्यमातून देऊ करत आहे अव्वल दर्जाचा श्राव्य व इन्फोटेनमेंट अनुभव
▪ ११,००० रुपये भरून बुकिंग १९ मेपासून खुले
गुरूग्राम, : निसान मोटर इंडियाने आपली विशाल, ठसठशीत, देखणी एसयूव्ही निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशन ७,३९,००० (एक्सशोरूम, दिल्ली) ह्या प्रारंभिक किमतीला बाजारात आणली आहे. प्रगत इन्फोटेनमेंट प्रणाली, शक्तिशाली कामगिरी, प्रगत सुविधा व सुधारित सुरक्षिततेच्या माध्यमातून मॅग्नाइट गेझा एक आकर्षक संयोजन देऊ करते. हे संयोजन चिकित्सक भारतीय ग्राहकांच्या प्रवासांचे स्वरूप पालटून टाकणार आहे. मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशन जपानी रंगभूमी आणि तिच्या बोलक्या सांगीतिक विषयवस्तूंपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे.
मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनचा हा संवेदनात्मक अनुभव सुधारित सुविधांच्या एका समूहाच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला आहे. ह्या सुविधा पुढीलप्रमाणे:
● हाय-रिझोल्युशन २२.८६ सेंटीमीटर (९ इंची) टचस्क्रीन
● वायरलेस कनेक्टिविटीसह अँड्रॉइड कारप्ले
● अव्वल दर्जाचे जेबीएल स्पीकर्स
● अॅपवर आधारित नियंत्रणासह भवतालची प्रकाशयोजना
● पथाच्या मार्गदर्शनासह रीअर कॅमेरा
● आसनांची उत्कृष्ट बेज रंगातील अपहोल्स्ट्री (ऐच्छिक)
● शार्क फिन अँटेना
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव किमतीच्या घोषणेबद्दल म्हणाले, "निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशन, अव्वल दर्जाच्या श्राव्य आणि इन्फोटेनमेंट अनुभवासह अपवादात्मक जीवनशैली मूल्य, एसयूव्ही विभागातील अत्यंत स्पर्धात्मक किमतीला, देऊ करते. त्यामुळे मॅग्नाइट हे सुरक्षितता व कामगिरीच्या सुविधांसह सर्वांत आकर्षक उत्पादन झाले आहे.”
मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनचे बुकिंग सर्व निसान शोरूम्समध्ये ११,००० रुपये भरून केले जाऊ शकत आहे. ही गाडी अनेक मोनोटोन (एका छटेचे) रंगांत उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार निवडीचे विस्तृत पर्याय देते. अशा प्रकारे ही सर्वाधिक विक्रीची बी-एसयूव्ही, मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनच्या माध्यमातून, ग्राहकांना आकर्षक मूल्यविधान देऊ करत आहे.
निसानने ग्राहकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने फिजिटल वितरण धोरण अवलंबले आहे. ह्यात ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व काही विनाकटकट पद्धतीने पुरवले जाते. ह्या धोरणामुळे एकात्मिक ऑफलाइन-ऑनलाइन पेमेंट पर्यायाच्या माध्यमातून एक अखंडित व सोयीस्कर अनुभव मिळतो. ग्राहक त्यांच्या पसंतीच्या शोरूममधून ही सोय उपलब्ध करून घेऊ शकतात.
निसान मॅग्नाइटचा देखभाल खर्च सर्वोत्तम तसेच ह्या विभागातील सर्वांत कमी म्हणजेच प्रतिकिलोमीटर केवळ ३५ पैसे (५०,००० किलोमीटर्सपर्यंत) आहे. २ वर्षांच्या (५०,००० किलोमीटर्सपर्यंत) वॉरंटीमुळे ग्राहकांना मन:शांती मिळते. नाममात्र शुल्क भरून ह्या वॉरंटीचा पाच वर्षांपर्यंत (किंवा एक लाख किलोमीटर्सपर्यंत) विस्तार केला जाऊ शकतो. निसान सर्व्हिस हबमार्फत सर्व्हिस कॉस्ट कॅलक्युलेटरने किंवा निसान कनेक्टमार्फत, निसान ग्राहक सर्व्हिसिंगचे आरक्षण करू शकतात व ऑनलाइन खर्चही तपासू शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाते.
आपल्या विभागातील सर्वोत्तम सुरक्षितता मानक राखल्याबद्दल निसान मॅग्नेटिकला ग्लोबल एनसीएपीतर्फे प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फोर-स्टार सुरक्षितता दर्जा देण्यात आला आहे. सर्व प्रकारांमध्ये अतिरिक्त सुरक्षितता सुविधा देऊन निसानने अलीकडेच मॅग्नाइटमध्ये आणखी सुधारणा केली आहे. बीएस६ फेज २मध्ये प्रवेश करण्यासोबत ह्या सुरक्षा सुविधांमुळे गाडीचे मूल्य वाढले आहे. ह्या सुरक्षितता सुविधांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:
● इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी)
● ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस)
● हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए)
● टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस)
डिसेंबर २०२० मध्ये बाजारात आल्यापासून मॅग्नाइट हे भारतातील बी-एसयूव्ही विभागातील विशेष पसंती दिले जाणारे वाहन ठरले आहे. या मॉडेलचे डिझाइन जपानमध्ये करण्यात आले आहे, तर उत्पादन भारतात करण्यात आले आहे. ‘मेक-इन-इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड (भारतात, संपूर्ण जगासाठी, उत्पादन करणे)’ ह्या निसान मोटर इंडियाच्या उत्पादन तत्त्वाशी हे सुसंगत आहे.
मॅग्नाइटने बाजारात आल्यापासून अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेत. ह्यांत अलीकडेच झालेल्या दैनिक जागरण आयनेक्स्ट आयकनिक अवॉर्ड्स सोहळ्यात प्रदान करण्यात आलेला ‘२०२३ आयकनिक ब्रॅण्ड ऑफ द इयर’ पुरस्कार; टॉप गीअरचा ‘कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर २०२१’; मोटर ऑक्टेनचा ‘गेम चेंजर’ पुरस्कार; ऑटोकारचा ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पुरस्कार ह्यांसह अन्य अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
अधिक तपशिलांसाठी कृपया भेट द्या:
https://www.one.nissan.in/book-a-car