मुंबई : पवार कुटूंब एकत्रित आले की कार्यकर्त्यांना वाटतं की, हे एकत्र आहेत. आपण कशाला वाईटपणा घ्यायचा असंही अनेक जण म्हणतात. पण आपण आता पुढे गेलो आहेात. पवार कुटूंबात कोठेही मॅचफिक्सिंग नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पडल्यावर उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी हे स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर काही कार्यक्रमात शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्रित दिसले होते. त्यावरूनच अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले की, कौटूंबिक कार्यक्रमात हजेरी लावली म्हणजे एकत्र आलं असं होत नाही. कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात. मात्र तसं काही नाही. आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायाची नाही, असं अजित पवार म्हणाले. आम्ही वेगळी भूमिका घेतली आहे. आता त्यात बदल नाही, हे मी स्टॅमपेपर देखील लिहून देतो, असेही अजित पवार म्हणाले.
प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो वयोमानाप्रमाणे नवी पिढी पुढे येत असते त्यांना मार्गदर्शन करावे लागते. मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
कमळावर लढणार नाही
अजित पवार कमळावर लढणार अशाही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावेळी त्यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की मी कमळावर लढणार आहे. मात्र असं काही नाही, असं अजित पवार म्हणाले.