नुवामा संपत्ती 5 वर्षात एयूए 5x ने वाढून रुपये ~2.5 लाख कोटी (यूएसडी ~30 अब्ज) होईल
SANTOSH SAKPAL
20, 4-12 07:32 PM
- टियर I शहरांपलीकडे 5 वर्षांत 300 ठिकाणे कव्हर करण्याचे उद्दिष्ट
- पुढील 3 वर्षांत आरएमची संख्या 100% वाढवणे
- 5 वर्षांत भागीदार नेटवर्क 5 पट वाढवणे
मुंबई, : नुवामा वेल्थ, नुवामा वेल्थ मॅनेजमेंटची वैयक्तिक संपत्ती शाखा, जी उच्च-निव्वळ–मूल्य व्यक्ती (एचएनआय) आणि समृद्ध विभागाच्या आर्थिक गरजा पूर्ण करते, द्वारे आज एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली गेली आहे ज्याचे उद्दिष्ट 2028 पर्यंत 5x ते रुपये ~ 2.5 लाख कोटी (यूएसडी~30 अब्ज) ने एयूए वाढवण्याचे आहे.
नुवामा वेल्थ एकल उत्पादन केंद्रित वितरण फ्रँचायझी पासून ते पूर्ण संपत्ती व्यवस्थापन कंपनी बनली आहे. हायब्रीड सर्व्हिसिंग, मल्टी-प्रॉडक्ट आणि सेवा आणि सानुकूलित सोल्यूशन्स यांच्या मूळ तत्त्वज्ञानाच्या आधारे उत्कृष्ट ग्राहक अनुभव देताना भागधारकांसाठी यांनी महत्त्वाचे मूल्य निर्माण केले आहे.
पत्रकारांशी बोलताना, नुवामा वेल्थचे अध्यक्ष आणि प्रमुख राहुल जैन म्हणाले, “जागतिक बँक आणि सीएमआयई अहवालानुसार भारत या दशकाच्या अखेरीस यूएसडी 10 ट्रिल्यन अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे; मुख्यतः उद्योजकीय वाढीच्या इंजिन ला आपण टियर 1 शहरांच्या बाहेर ऊर्जा मिळत असतांना पाहत आहोत. या प्रवासात नुवामा वेल्थ व्यवसाय, प्रवर्तक आणि ग्राहकांना संपत्ती निर्मिती आणि उदयास येणार्या संधींसाठी कल्पक बुद्धिमत्ता आणि दृष्टीकोन प्रदान करण्यास सक्षम असेल. भारतातील टियर II आणि III शहरे अशी आहेत जिथे आम्ही आमच्या ग्राहकांसोबत भागीदारी आणि वाढीसाठी उपस्थित राहू इच्छितो जे त्यांच्या व्यवसाय विस्ताराच्या प्रवासात प्रगती करत असताना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि लक्षणीय संपत्ती निर्माण करण्यास सुरवात करतील.”
तीन प्रमुख प्राधान्यक्रमांची अंमलबजावणी करून वाढ सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट आहे:
- भौगोलिक पोहोच वाढवणे: टियर II आणि III शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करून संपूर्ण भारतातील पोहोच वाढवने ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजकीय वाढ दिसून येईल. सध्या 69 ठिकाणी स्थित, नुवामा वेल्थने 2028 पर्यंत 300 पेक्षा जास्त स्थानांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
- आरएमची संख्या वाढवणे: वाढती संपत्ती आणि भौगोलिक पोहोच यामुळे सर्व संपत्ती व्यवस्थापन उपायांसाठी गुणवत्ता सल्ला केंद्रस्थानी बनते. नुवामा वेल्थने आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील 3 वर्षांत रिलेशनशिप मॅनेजर (आरएम) च्या टॅलेंट पूलमध्ये 100% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- समृद्ध आणि एचएनआय विभागासह विश्वास वाढवणे: हायब्रिड (मानवी + टेक) व्यवसाय मॉडेलसह, उच्च स्पर्श सेवा ही काळाची गरज आहे. या विभागाचा विश्वास संपादन करण्यासाठी नुवामा वेल्थ प्रतिबद्धता वाढविण्यावर, उत्पादन संचाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करेल आणि या विभागासाठी सानुकूलित उपाय प्रदान करणे सुरू ठेवेल.
नुवामा वेल्थ ग्राहकाच्या आर्थिक जीवन चक्राची पूर्तता करण्यासाठी संपत्ती व्यवस्थापन उपाय आणि सल्ल्याची विस्तृत श्रेणी देऊ करते. नुवामा वेल्थ ~10 लाख (~1 दशलक्ष) पेक्षा जास्त श्रीमंत व्यक्ती आणि उच्च-निव्वळ-मूल्य व्यक्तींना सेवा देते.
स्वतंत्र सूचिबद्ध कंपनी होण्याच्या प्रवासात, समूहाने स्वतःला एडलवाईस वेल्थ मॅनेजमेंट ते नुवामा असे नाव दिले आहे. नवे नाव, वामा सह नु हे संपत्ती व्यवस्थापनाकडे नवीन दृष्टीकोन आणण्याच्या समूहाच्या ध्येयाचे प्रतीक आहे.