मदर्स डे च्या निमित्ताने हृदयाच्या तारा छेडणाऱ्या मालिकांच्या माध्यमातून सोनी सब करत आहे आई आणि सासूचा गौरव
Santosh Sakpal
May 11, 2023 11:16 PM
आपल्या जीवनात आईचे एक विशेष आणि अढळ स्थान असते. मदर्स डे जवळ आला आहे आणि हाच आपल्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या स्त्रीचा म्हणजे आपल्या आईचा गौरव करण्याचा दिवस आहे. पारंपरिक दृष्ट्या आईकडे एक ‘जन्मदात्री’ या नात्याने बघितले जाते. सोनी सबने ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘दिल दियां गल्लां’ आणि ‘वागले की दुनिया’ सारख्या विचार प्रवण मालिकांमधून या पारंपरिक कल्पनेला छेद दिला आहे. या मालिकांमध्ये सासू आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन यांचे नाते वेगळ्या स्वरूपात मांडले आहे. यामध्ये सासू की फक्त सासू न दाखवता एक मातेसमान स्त्री पात्र दाखवले आहे. मालिकांमधील या अपारंपरिक जोड्या पारंपरिक कल्पनांना छेद देतात आणि आई आणि मुलीच्या नात्याला मर्यादा नसतात, हे दाखवून देतात.
सोनी सबवरील वागले की दुनिया या लोकप्रिय मालिकेत वेगवेगळ्या पिढ्यांमधली आई दाखवली आहे. राधिका वागले आणि वंदना वागले ही अशीच एक सासू-सुनेची सुंदर जोडी आहे. या दोघींचे सुंदर नाते आहेत आणि नात्यातील स्वतःची भूमिका त्या दोघी चोख बजावत असतात. राधिक निखळ मनाची स्त्री आहे आणि आसपासचे बदल तिने छान स्वीकारले आहेत. गोष्टी हातळताना तिची जी पुरोगामी विचारसरणी दिसते, ती कौतुकास्पद आहे. पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा एक प्रेमळ सासू आहे. आपल्या मुलाच्या पत्नीशी तिचे मैत्रीपूर्ण नाते आहे. सासू-सुनेच्या नात्यातील एक वेगळाच रंग येथे अनुभवता येतो.
दिल दियां गल्लां मालिकेत संजोत, एका आईप्रमाणेच आपल्या सुनेचे रक्षण करण्याची भूमिका बजावते. या नात्याबद्दल तिचे मत देखील आगळेवेगळे आहे. आपल्या कृतीमधून ती हे दाखवून देते की, त्या दोघींचे नाते अगदी आई-मुली सारखेच आहे. ही सगळी आपल्यातली वाटणारी पात्रे आहेत. या मदर्स डे ला आपल्या सासूसोबत बघण्यासाठी या मालिका उत्तम पर्याय पुरवितात.
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पाचे काम करणारी करुणा पांडे म्हणते, “आईचे प्रेम अमर्याद असते. आपल्या मुलांसाठी अशा अनेक गोष्टी करून पुष्पा याचे उदाहरण सादर करते. आपल्या सुनेच्या बाबतीतही ती तितकीच समर्पित आहे. तिच्यावर देखील ती निरपेक्ष प्रेम करते. आपल्या मुलांप्रमाणेच तिचीही काळजी घेते. प्रत्येक आईकडे प्रेमाची अशी एक ताकद असते की तिच्या मुलांसाठी ते प्रेम अभेद्य कवच बनून राहते, कोणत्याही प्रकारच्या हानिपासून त्यांना वाचवते तसेच त्यांच्या हिताचे रक्षण करते. पुष्पाची निस्वार्थ वृत्ती आणि समर्पण हे एका आईच्या प्रेमाची ताकद आणि त्यातील लवचिकता यांचे एक जिवंत उदाहरण आहे.”
‘वागले की दुनिया’ मालिकेत वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “वंदना म्हणजे आजच्या जमान्याच्या आईचा नमूना आहे. तिचेही आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम आहे. मात्र तिचे आपल्या सासूशी अगदी वेगळे नाते आहे. या सासूने खुल्या दिलाने तिला स्वीकारले आहे आणि आपल्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम केले आहे. यावरून पुन्हा ही गोष्ट जाणवते की, मातृत्व हे केवळ जैविक नाही आणि प्रेमाला मर्यादा नसतात. त्या दोघींचे ते सुंदर नाते खूप लोभस वाटते. त्यातून आपल्याला सुद्धा ही प्रेरणा मिळते की, नात्याला लेबल न लावता शक्य असेल, तिथे तिथे प्रेम मोकळ्या मनाने स्वीकारावे आणि द्यावे. माझ्या व्यक्तिशः अनुभव असा आहे की, माझ्या सासूशी माझे असेच नाते आहे. आणि त्यामुळे माझे जीवन अनेक अर्थांनी समृद्ध झाले आहे. सर्व प्रेमळ मातांचा मग त्या जन्मदात्या असो वा नसो, गौरव करू या. त्यांच्यामुळेच हे जग अधिक सुंदर बनले आहे.” दिल दियां गल्लां मालिकेत संजोतची भूमिका करणारी जसजीत बब्बर म्हणते, “प्रत्येक सासू ही सुद्धा कधी तरी सून असतेच. त्यामुळे आपल्या सासूचे प्रेम मिळणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे ती जाणते. सासूचे महत्त्व आईइतकेच असते. सासू आणि सून यांचे नाते घट्ट, मार्गदर्शन, आधार देणारे असू शकते. मला खूप भावलेली संजोत ही माझी व्यक्तिरेखा अशाच एका नात्याचे प्रतिनिधित्व करते. संजोतचे अनुभव आणि तिच्यापुढील आव्हाने मला समजू शकतात, कारण मी स्वतः देखील या नात्यातील सौंदर्य आणि गुंतागुंत हे दोन्ही अनुभवले आहे. संजोतच्या कथेतून या नात्याची लक्षणीयता अधोरेखित झाली आहे. आणि एका सासूची घरात काय भूमिका असते हे मला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकले आहे.”