नुकत्याच लाँच झालेल्या वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन्स आणि हीअरेबल्ससाठी आकर्षक ऑफर्स जाहीर
Santosh Sakpal
August 31, 2023 03:44 PM
बंगळुरू, - जागतिक मोबाइल तंत्रज्ञान ब्रँड, वनप्लसने गेल्या महिन्यात वनप्लस समर लाँच इव्हेंटदरम्यान वनप्लस नॉर्ड3 5जी, वनप्लस नॉर्ड सी.ई3 5जी आणि वनप्लस नॉर्ड बड्स 2आर या नवीन आतुरतेने प्रतीक्षेत असलेल्या नॉर्ड डिव्हाइसेसच्या श्रेणीचे अनावरण केले. दोन्ही स्मार्टफोनमध्ये अत्यावश्यक कार्यक्षमतेशी तडजोड न करता उद्योगांमध्ये खूपच आव्हानात्मक किंमतींवर फ्लॅगशिप उच्च -कामगिरी वैशिष्ट्ये दिली आहेत. वनप्लस नॉर्ड3 5जी हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन आहे, जो डॅझलिंग फोटोग्राफी आणि सुंदर आणि कालातीत वनप्लस डिझाइनसह ब्लेझिंग वेगवान कामगिरीची सांगड घालतो. दुसरीकडे, वनप्लस नॉर्ड कोर एडिशन फॅमिली - वनप्लस नॉर्ड सी.ई3 5जी मध्ये वापरकर्त्यास आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक गोष्टी आणि बरेच काही परवडणाऱ्या किंमतीत ठासून भरले आहे. नॉर्ड सी.ई3 5जी चे उद्दीष्ट समुदायाचे आवडते फ्लॅगशिप तंत्रज्ञान आणि खास वनप्लस अनुभव अधिक सुलभ आणि विविध वापरकर्त्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध करणे आहे.
वनप्लस नॉर्ड3 5जी सोबतच वनप्लसने नवीन वनप्लस नॉर्ड बड्स 2आर देखील लाँच केले आहे. उत्कृष्ट बास परफॉर्मन्स आणि सुलभ टिकाऊपणा दर्शविणारे, इयरबड्स सध्या बाजारात सर्वोत्तम मूल्य देणाऱ्या टी.डब्ल्यू.एस इयरबड्सचे प्रतिनिधित्व करतात.
वनप्लस नॉर्ड 3 5जी
वनप्लस नॉर्ड3 5जी वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमधून त्यांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. केवळ रु.33,999 पासून सुरू होणारा आणि 15 जुलैपासून विक्रीसाठी सुरू होणारा हा वनप्लस नॉर्ड आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस नॉर्ड फोन आहे आणि मिस्टी ग्रीन किंवा टेम्पेस्ट ग्रे मध्ये उपलब्ध असलेल्या डॅझलिंग फोटोग्राफी आणि सुंदर आणि कालातीत वनप्लस डिझाइनसह ब्लेझिंग वेगवान कामगिरीची सांगड घालतो. 6.74 इंच 120 हर्ट्झ एमोलेड स्क्रीन सह, वनप्लस नॉर्ड3 5जी कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊन उठून दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि स्क्रीन टू बॉडी रेशिओ 93.5% आहे आणि बाजूचे बेजेल्स फक्त 1.46 मिमी आहेत. आणि हो, यात अलर्ट स्लाइडर आहे.
फोनच्या आतील बाजूस मीडियाटेक डायमेंसिटी 9000 चिपसेट आणि 16 जी.बी पर्यंत एल.पी.डी.डी.आर5एक्स रॅम म्हणजे वनप्लस नॉर्ड 2टी 5जी पेक्षा 42.9% चांगली सी.पी.यू कामगिरी आणि 58.6% जी.पी.यू च्या कामगिरीत वाढ, तसेच एकाच वेळी 44 अॅप्स चालू ठेवण्याची क्षमता असणे. आणि वनप्लस नॉर्ड3 5जी देखील त्याच्या 5000 एम.एएच बॅटरीमुळे स्वत: ला विस्तारित कालावधीसाठी चालू ठेवू शकते - वनप्लस नॉर्ड 2टी पेक्षा 10% पेक्षा जास्त. 80वॉट सुपरवूक चार्जिंग आणि वनप्लसच्या बॅटरी हेल्थ इंजिन तंत्रज्ञानामुळे वनप्लस नॉर्ड3 5जी 1600 चार्जिंग सायकलसाठी जलद आणि सुरक्षितपणे चार्ज होईल.
वनप्लस नॉर्ड3 5जी च्या मागील बाजूस तेच इमेजिंग हार्डवेअर आहे जे या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या स्मॅश हिट वनप्लस11 5जी मध्ये दिसले होते, 50 मेगापिक्सेल सोनी आय.एम.एक्स 890 सेन्सर आणि वनप्लसने प्रत्येक वेळी उत्कृष्ट इमेजिंग परिणाम देण्यासाठी डिझाइन केलेले अल्गोरिदम विकसित केले आहेत. शेवटी, वनप्लस नॉर्ड3 5जी देखील वनप्लसच्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती ऑक्सिजनओ.एस 13.1 सह लॉन्च करते, जे ऑक्सिजनओ.एस 12 पेक्षा अॅप्लीकेशनच्या पॉवर वापरात 40% घट आणि 15% वेगवान अॅप इन्स्टॉलेशन देते.
वनप्लस नॉर्ड सी.ई3 5जी
वनप्लस नॉर्ड सी.ई3 फ्लॅगशिप फोनमध्ये सहसा दिसणारे तंत्रज्ञान वापरते आणि ते सर्वांसमोर आणते.
वनप्लस नॉर्ड सीई3 5जी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 782जी प्रोसेसर आहे, जो पॉवर-पॅक्ड कामगिरी आणि अखंड पॉवर मॅनेजमेंट दरम्यान परिपूर्ण संतुलन प्रदान करण्यासाठी निवडला गेला आहे. डिव्हाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे, ज्यामुळे वेगवान आणि स्मूथ अनुभव मिळतो, जो फ्लॅगशिप फोन्सवर बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळतो, जे वनप्लस नॉर्ड सी.ई3 ला एकाच वेळी 24 अॅप्स दरम्यान सहजपणे मल्टीटास्क करण्यास सक्षम करते. यात 5000 एम.एएच ची मोठी बॅटरी आणि 80वॉट सुपरवूक चार्जिंग देण्यात आले आहे, जे युजर्सला अवघ्या 15 मिनिटांत एका दिवसाची पॉवर देते.
वनप्लस नॉर्ड सी.ई3 मध्ये 93.4% स्क्रीन टू बॉडी रेशिओसह सुपर प्रीमियम डिझाइन आहे आणि हे डिझाइन फोनच्या मागील बाजूस अॅक्वा सर्ज आणि ग्रे शिमर या दोन सुंदर रंगांसह पण असते. दोन्ही कलरवेमध्ये स्टेनलेस स्टील कॅमेरा सराऊंड्स देण्यात आला आहे जे 50 मेगापिक्सेल सोनी आय.एम.एक्स 890 प्रोसेसरचे वाढीव पोर्ट्रेट क्षमतेसह संरक्षण करते.
किंमत आणि उपलब्धता
वनप्लस नॉर्ड सी.ई3 5जी दोन व्हेरिएंटमध्ये येतो - 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट रु. 26,999 मध्ये आणि 12 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट रु. 28,999 मध्ये amazon.in, oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, ऑफलाइन भागीदार आणि वनप्लस स्टोअर अॅपवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
वनप्लस नॉर्ड3 5जी दोन व्हेरिएंटमध्ये येतो - 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट रु.33,999 मध्ये आणि 16 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट रु.37,999 मध्ये amazon.in, oneplus.in, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, ऑफलाइन भागीदार आणि वनप्लस स्टोअर अॅपवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
ऑफर्स
आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट ई.एम.आय आणि डेबिट कार्ड ई.एम.आय वापरकर्त्यांना OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स आणि Amazon.in वरून वनप्लस नॉर्ड3 5जी खरेदी केल्यास रु.1000 चा त्वरित बँकेकडून सवलत मिळेल. ही ऑफर 1 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध आहे
वनकार्ड क्रेडिट कार्ड आणि ई.एम.आय वापरकर्त्यांना OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स आणि Amazon.in वरून वनप्लस नॉर्ड3 5जी खरेदी केल्यास रु. 1000 चा त्वरित सवलत मिळेल. ही ऑफर 1 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध आहे
1 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत वापरकर्ते OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, भागीदार स्टोअर्स आणि Amazon.in निवडक बँकांमध्ये खरेदी करताना वनप्लस नॉर्ड3 वर 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा लाभ घेऊ शकतात. नॉर्ड सी.ई3 5जी वर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ई.एम.आय उपलब्ध आहे अॅक्सिस बँक, सिटी, एच.डी.एफ.सी बँक, आय.सी.आय.सी.आय बँक, एस.बी.आय कार्ड आणि वनकार्ड आणि अॅमेझॉन पे (अॅमेझॉनवर लागू)
1 सप्टेंबरपासून वनप्लस नॉर्ड3 5जी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना ई.एम.आय व्यवहारांद्वारे अॅक्सिस बँक आणि सिटी क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स आणि Amazon.in वरून सर्व वनकार्ड व्यवहारांवर रु. 2000 ची बँकेकडून सवलत मिळेल. ही ऑफर 1 सप्टेंबरपासून वैध असेल.
वनप्लस नॉर्ड सी.ई3 5जी अॅक्सिस बँक आणि सिटी क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ई.एम.आय व्यवहारांद्वारे आणि OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स आणि Amazon.in सर्व वनकार्ड व्यवहारांद्वारे रु.1000 च्या त्वरित सवलतीसाठी लागू असेल. ही ऑफर 1 सप्टेंबरपासून वैध असेल. याशिवाय अॅक्सिस बँक, सिटी, एच.डी.एफ.सी बँक, आय.सी.आय.सी. आय बँक, एस.बी.आय कार्ड आणि वनकार्डवर 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ई.एम.आय मिळणार आहे.
वनप्लस नॉर्ड बड्स 2आर
12.4 मिमी अधिक मोठ्या ड्रायव्हर्सद्वारे पॉवर केलेले, वनप्लस नॉर्ड बड्स 2आर समृद्ध आणि स्पष्ट ध्वनी प्रदान करते जे वापरकर्त्यांच्या आवडत्या ट्यून्समध्ये जीवंतपणा आणते, तर ड्युअल माइक्स आणि ए.आय कॉल अल्गोरिदम वातावरणातील आवाज अचूकपणे फिल्टर करतात आणि स्पष्ट मानवी आवाज कॅप्चर करतात, एकदम स्पष्ट फोन कॉल्स देतात.
टिकाऊपणा हे वनप्लस नॉर्ड बड्स 2आर चे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. अभूतपूर्व दीर्घ बॅटरी लाइफ, आय.पी55 पाणी आणि घाम रोधक आणि स्मूथ एर्गोनॉमिक डिझाइनसह, इयरबड्स एकही बीट न चुकवता तीव्र वर्कआउट आणि आउटडोअर साहस सारख्या गोष्टी पण समर्थपणे पेलू शकतात. अखंड कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून, वनप्लस नॉर्ड बड्स 2आर मजबूत आणि स्थिर कनेक्शनसाठी ब्लूटूथ 5.3 ला समर्थन देतो. अखंड अनुभवासाठी डिझाइन केलेले, इयरबड्स उच्च कार्यक्षमतेचा त्याग न करता सर्वात सक्रिय जीवनशैलीसाठी तयार केले गेले आहेत.
वनप्लस नॉर्ड बड्स 2
वनप्लस नॉर्ड बड्स 2 हे सक्रिय ध्वनी रद्दीकरण (ए.एन.सी) समर्थन करणारे पहिले नॉर्ड टी.डब्ल्यू.एस आहेत आणि ऑडिओ गुणवत्तेत प्रभावी बास आणि प्रचंड स्पष्टता प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे. बासवेव्ह™ एन्हान्समेंटसह, वनप्लस नॉर्ड बड्स 2 ऑडिओ सामग्रीला त्याच्या मूळ गुणवत्तेशी प्रामाणिक राहण्यास आणि व्यापक बास प्रदर्शित करण्यास मदत करते. बोल्ड बीट्ससाठी बासची गुणवत्ता वाढविण्यासाठी हे 12.4 मिमी अधिक-मोठे एन्हान्समेंट ड्रायव्हर युनिटसह सुसज्ज आहे. इमर्सिव्ह अनुभव प्रदान करण्यासाठी, वनप्लस नॉर्ड बड्स2 25 डी.बी खोली आणि ड्युअल-कोर प्रोसेसरसह सहज सक्रिय ध्वनी कॅन्सलेशन वैशिष्ट्याद्वारे पार्श्वभूमी आवाज कमी करते. स्वस्थता आणि शांतता राखण्यासाठी, वनप्लस नॉर्ड बड्स 2 वापरकर्त्यांना पारदर्शकता प्रकार देतो, जो वापरकर्त्यांना बाहेरील आवाज आणि पार्श्वध्वनी ऐकत असताना संगीत ऐकण्याचा अनुभव देतो.
संतुलित, हृदयाला खुश करणारे, बास आणि बोल्ड सह अनेक प्रकार देऊन, वापरकर्ते त्यांना हव्या असलेल्या हायलाइट केलेल्या ध्वनी ते निवडू शकतात. वनप्लस नॉर्ड बड्स 2 ची अचूक बॅटरी लाइफ वापरकर्त्यांना आणखी वापरण्याची संधि देते आणि बड्स जास्त काळ टिकतात. त्याच्या केसशिवाय फुल चार्ज 7 तास आणि चार्जिंग केससह 36 तासांपर्यंत टिकू शकतो. सक्रिय ध्वनि रद्दीकरण बंद केले तर 5 तासांपर्यंत वापराची हमी देण्यासाठी केवळ 10 मिनिटांचे चार्जिंग लागते. हे प्रमाणित आय.पी 55 रेटिंगसह धूळ आणि पाण्याविरूद्ध टिकाऊ देखील आहे.
किंमत आणि उपलब्धता
वनप्लस नॉर्ड बड्स 2आर डीप ग्रे आणि ट्रिपल ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत रु 2,199 पासून सुरू होते. वनप्लस नॉर्ड बड्स 2आर oneplus.in, वनप्लस स्टोअर अॅप, Amazon.in, Flipkart.com, Myntra.com, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स आणि निवडक भागीदार स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. वनप्लस नॉर्ड बड्स 2 थंडर ग्रे आणि लाइटनिंग व्हाईट कलर व्हेरिएंटमध्ये रु.2,999 मध्ये उपलब्ध आहे.
ऑफर्स
वनकार्ड वापरकर्ते आणि आय.सी.आय.सी.आय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ई.एम. आय आणि नेटबँकिंग वापरकर्ते OnePlus.in, वनप्लस स्टोअर अॅप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in आणि Flipkart.com वरून वनप्लस नॉर्ड बड्स2 आणि नॉर्ड बड्स 2आर च्या खरेदीवर रु. 200 पर्यंत त्वरित सूट घेऊ शकतात. ही ऑफर 1 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध आहे.