शिवाजी पार्क स्वतंत्रता दौड - २०२३ चे आयोजन
Santosh Gaikwad
August 02, 2023 11:49 AM
मुंबई : देशासाठी अनेक कसोटी पट्टू घडवणाऱ्या शिवाजी पार्क जिमखान्याने तो वसा आजही पुढे सुरु ठेवला आहे. त्याच बरोबर इतर खेळांनाही जिमखान्याने वेळोवेळी प्रोत्साहन देऊन स्पर्धांचे आयोजन यशस्वी रित्या केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शिवाजी पार्क जिमखान्याने २० ऑगस्ट २०२३ रोजी “ शिवाजी पार्क स्वतंत्रता दौड -२०२३ “ चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजता होणाऱ्या ५ किलो मिटर दौड मध्ये शेकडो धावपटू सहभागी होतील.
शरीर निरोगी राहून आयुष्याचा आनंद अधिकाधिक लुटण्यासाठी चालणे आणि धावणे या दोन व्यायामांच्या प्रकारांची गरज आहे हे सर्वांनाच जाणवले आहे , धावण्याच्या व्यायामाची जन जागृती होण्याचा उद्देश ठेऊनच शिवाजी पार्क जिमखान्याने सलग दुसऱ्या वर्षी “ शिवाजी पार्क स्वतंत्रता दौड ” चे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त संख्येने या दौड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी पार्क जिमखान्याने केले आहे.
१० वर्षां वरील इच्छुक धावपटूनी https://registrations.indiarunning.com/shivaji-park-gymkhana-run-2023-22677 किंवा “ India Running ” येथे नाव नोंदवावे . या दौड साठी सभासदांसाठी प्रवेश शुल्क रुपये ३००/- आणि इतरांसाठी रुपये ५००/- आहे.
दौड मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूना जिमखान्यातर्फे भेटवस्तू देण्यात येतील.
शिवाजी पार्क स्वतंत्रता दौड २०२३ चा मार्ग खालील प्रमाणे आहे.
शिवाजी पार्क जिमखाना → मॉंसाहेब पुतळा → बरिस्ता → स्काऊट सभागृह → उद्यान गणेश मंदिर → केटरिंग कॉलेज → श्री सिद्धिविनायक मंदिर पेट्रोल पंप
परतीचा मार्ग
श्री सिद्धिविनायक मंदिर पेट्रोल पंप → विजय सेल्स → वीर सावरकर स्मारक स्टेटस होटेल सिग्नल → बरिस्ता → शिवाजी पार्क जिमखाना.