प्राचार्य आर. आर. साहूराजा यांची शुक्रवारी शोकसभा

Santosh Gaikwad September 14, 2023 05:50 PM



मुंबई : प्रा. रतनशहा रोहिंग्टन साहूराजा यांचे रविवार, दि. १० सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ५.४५ वाजता खंबाला हिल येथील पारसी जनरल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांची शोकसभा शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

   प्राध्यापक साहूराजा हे अर्थशास्त्र विषयाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. गेली ५५ वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून विविध संस्थांमध्ये कार्य केले. त्यामध्ये प्राध्यापक, एम. डी. कॉलेज, अर्थशास्त्र विभागप्रमुख, रामनारायण रुईया कॉलेज, प्राचार्य पोदार कॉलेज, मुख्य मार्गदर्शक वेलिंगकर व्यवस्थापन संस्था यांचा समावेश आहे. जे. एन. टाटा ट्रस्टचे ते दोन वर्षे संचालक होते. तर दोराबजी टाटा ट्रस्टवरही त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसून येतो.

   जगभरात त्यांचे हजारो विद्यार्थी अनेक देशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. एन.एस.एस. शिबिरांच्या माध्यमातून अनेक गावात त्यांनी विविध ग्रामीण विकास प्रकल्प राबविले आहेत. त्यातून ४० वर्षांपूर्वी चांदीप, ता. वसई, जि. पालघर येथे निर्मिती यूथ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. शैक्षणिक आणि ग्रामीण महिला उद्योजकता याबाबतचे कार्य ही संस्था करते.