पी अँड जी इंडिया विविध लिंगात्मक समुदायाकरिता ‘शेअरदप्राइड’साठी देशभरातील ५० हून अधिक शैक्षणिक संस्‍थांसोबत सहयोग करणार

SANTOSH SAKPAL May 09, 2023 10:11 PM

मुंबई, :  प्रॉक्‍टर अँड गॅम्‍बल इंडिया (पीअँडजी इंडिया) ने घोषणा केली की, कंपनी विविध लिंगात्मक समुदायासाठी ‘शेअरदप्राइड’ तयार करण्‍याकरिता देशभरातील ५० हून अधिक शैक्षणिक संस्‍थांसाबत सहयोग करणार आहे. ‘शेअरदप्राइड’सह कंपनी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना विविध लिंगात्मक समुदायाला विषम वातावरणात भेडसावणाऱ्या सजग व अवचेतन पूर्वाग्रहांबद्दल, त्‍याबाबतचे अडथळे व तथ्‍ये दूर करण्‍यास आणि आव्‍हानांना प्रकाशझोतात आणण्‍यास जागरूक व संवदेनशील करेल.  

‘शेअरदप्राइड’चा भाग म्‍हणून पीअँडजी इंडिया शैक्षणिक इकोसिस्‍टमला विविध समस्‍या व आव्‍हानांबाबत माहिती देण्‍यासाठी कार्यशाळा तसेच जागरूकता मोहिमांचे आयोजन करेल.

या उपक्रमाबाबत पीअँडजी इंडियाचे प्रॉडक्‍ट सप्‍लायचे उपाध्‍यक्ष  एक्झिक्‍युटिव्‍ह स्‍पॉन्‍सर अंकुर भगत म्‍हणाले, ‘‘पीअँडजीमध्‍ये इक्‍वॉलिटी अँड इन्‍क्‍लुजन (ईअँडआय) नेहमी आमच्‍या संस्‍कृतीचा आधारस्‍तंभ राहिला आहे, जेथे शिकण्‍याची, विकसित व यशस्‍वी होण्‍याची आणि प्रयत्‍न करण्‍याची समान संधी सर्वांना उपलब्‍ध आहे. यासंदर्भात आम्‍ही पीअँडजीच्‍या आत व बाहेर समान व सर्वसमावेशक विश्‍व निर्माण करण्‍यावर लक्ष केंदित करत आहोत. कंपनीअंतर्गत आम्‍ही आमच्‍या सर्वसमावेशक पॉलिसींच्‍या माध्‍यमातून हे ध्‍येय साध्‍य करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.