'प्रवास मातीतून प्रगतीकडे' पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

Santosh Gaikwad April 21, 2023 09:46 AM

मुंबई- सदाशिव भानू चिंदरकर यांनी लिहिलेल्या प्रवास मातीतून प्रगतीकडे' या पुस्तकाचा प्रकाशन  सोहळा नुकताच सूर्या हॉल, लक्ष्मी नारायण मंदिर, अंधेरी येथे संपन्न झाला.

मंत्रालयातून उपसचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर सदाशिव चिंदरकर हे कुंभार समाज मुंबई; ज्येष्ठ नागरिक संघटना, जे.बी.नगर अंधेरी; तसेच चिंदर ग्रामोन्नती मंडळ मुंबई; अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असून सामजिक कार्य करीत आहेत. कोकणातील आपल्या चिंदर गावापासून सुरु झालेला हा प्रवास त्यांनी 'प्रवास मातीतून प्रगतीकडे' या पुस्तकरूपात रेखाटला आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध सर्जन  अविनाश मळगावकर, ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर,

पांडलोस्कर, मंत्रालय; डॉ चौधरी, जयपाल भसिन, मंत्रालयातील सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व  वक्त्यांनी आपल्या भाषणात चिंदरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. 

'प्रवास-मातीतून प्रगतीकडे' या पुस्तकात सदाशिव चिंदरकर यांच्या १९४१ ते २०२३ पर्यंतच्या आठवणी आहेत. मुंबईत ग्रामीण भागातून आलेला माणूस प्रामाणिक कष्ट करीत कार्यरत राहिल्यास आपली आणि समाजाचीही प्रगती करू शकतो ह्याचे 'प्रवास-मातीतून प्रगतीकडे' हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात कु. अमृता गद्रे हिच्या स्वागतगींताने झाली. सांगता सर्व उपस्थितांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाने केली. दिनेश चिंदरकर यांनी सूत्रसंचालन केले.