डोंबिवलीकरांचे माझ्यावरील विशेष प्रेमामुळे मी आमदार, मंत्री झालो : रवींद्र चव्हाण
Santosh Gaikwad
August 31, 2024 07:05 PM
जे देखे रवी पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ पत्रकर भाऊ तोरसेकर, श्रीकांत बोजेवार, श्रीराम शिधये, सुधीर जोगळेकर आदींची प्रमुख उपस्थिती
डोंबिवली: या शहराने मला भरपूर प्रेम दिल, या सांस्कृतिक, संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय, आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार, आचार तळागाळापर्यन्त पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत बोजेवार, श्रीराम शिधये, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, मसापचे डोंबवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवर उपस्थित होते.
द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली, स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमूळ ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीवर अवलंबून असतात. या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेला जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट आहे, तसेच त्या आधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते, त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले.
त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर, लीना ओक मॅथ्यू, वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगते व्यक्त झाली.
पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केले. समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधीनी एकत्र येऊन त्याचे प्रकाशन केले.
-----