मुंबई : आरोग्याच्या प्रश्नावर अनेक पुस्तकं आहे मात्र डॉ राजश्री कटके यांच्या पुस्तकातील भाषा त्यातील सोपेपणा आणि चित्रमय योगासने अतिशय सुंदर आणि महत्वाचे आहे. आरोग्याच्या पलीकडे एक विषय आहे ते म्हणजे ती परफेक्ट नाही.स्त्री कुठल्या तरी भावनेने पछाडलेली असते. शरीराबद्दलच्या न्यूनगंडा पलीकडे जाऊन आपल्या आरोग्याचा विचार करण्याची प्रेरणा देणारे डॉ कटके यांचे पुस्तक आहे असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गो-हे यांनी केले. डॉ राजश्री दयानंद कटके लिखित ' स्त्रियांचे आरोग्य विविध आजार व उपाय तसेच गरोदरपणातील समस्या ' या पुस्तकाचे प्रकाशन उपसभापती डॉ निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पाडलं त्यावेळी ते बोलतं होतं.
मुंबई मराठी पत्रकार संघात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर, प्रख्यात नेत्रतज्ञ, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद वाबळे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, पद्मा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निलम गो-हे पुढे म्हणाल्या की, बालवयापासून ते मासिक पाळी सुरू होण्यापासून ते मासीकपाळी निवृत्ती पर्यंत अशा अनेक मुद्दयावर विषयांवर तपशीलवार माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. अलिकडे अडचण असली तर आपण गुगलवर माहिती शोधतो अनेक वेळा बरी असते अनेकवेळा घाबरवून टाकणारी असते. अशावेळी डॉ कटके यांचे पुस्तक हे सर्वसामान्य स्त्रियांना आरोग्याबद्दल सकारात्मक भूमिका देणारे आहे.
आरोग्याच्या कारणावरून बऱ्याचदा स्त्रियांवर हिंसाचार होतो. कधी मूल झालं नाही म्हणून, तर कुठलाही आजार झाला तर डॉक्टरकडे जायचे कसे ? असा प्रश्न असतो. अशा वेळेला स्त्रियांचे आरोग्य हे पुस्तक 'स्त्रियांचे आरोग्य विविध आजार व उपाय तसेच गरोदरपणातील समस्या ' हे पुस्तक महत्वाचं ठरणार आहे असेही गो-हे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज दळवी यांनी केले.
*****