वॉशिंग्टन : खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात अनेक अपडेट्स येत आहेत. खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, त्यांच्या केसवर अमेरिकेचंही लक्ष आहे.
राहुल गांधींवरील मानहानीचा खटला, त्यानंतर कोर्टाने दिलेली शिक्षा आणि रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण तापलं आहे. राहुल गांधींवरील कारवाईनंतर आता देशभर आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात अमेरिकेला कोणताही हस्तक्षेप करायचा नाही. परंतु तिथल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर अमेरिकेचं लक्ष आहे. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे.