राहुल गांधींना जामीन मंजूर : सत्य हेच माझं अस्त्र गांधीचे ट्वीट !

Santosh Gaikwad April 03, 2023 06:20 PM

राहुल गांधींना जामीन मंजूर : सत्य हेच माझं अस्त्र गांधीचे ट्वीट !


दिल्ली : काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांना आज सुरत कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्या दुसऱ्या याचिकेवरची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. मात्र सुरत कोर्टातून जामीन मिळताच राहुल गांधींसह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यानंतर राहुल गांधी यांचं ट्वीट केलं आहे.  माझा संघर्ष सुरू आहे आणि सत्य हेच माझं अस्त्र आहे असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू आहे. 


 राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. गांधी यांनी सुरतच्या कोर्टात आव्हान याचिका दाखल केली असून, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा ! असं ट्वीट राहुल गांधींनी केले आहे. 


https://twitter.com/RahulGandhi/status/1642839742688690178?s=20