52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबईः जयपूर रेलवे ट्रेनमध्ये आज रेलवे सुरक्षा दलाच्या एका जवानाने चौघांची गोळ्या झाडून हत्या केली. पालघर स्टेशनजवळ ही घटना घडली.हत्या झालेल्यांत एका सहाय्यक फौजदाराचा समावेश असून जयपूर एक्सप्रेसमध्ये (१२९५६) ही घटना घडली. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
रेलवे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतन सिंग याने पहाटे ५.०० वा. आपल्याकडील स्वयंचालित बंदूकीतून गोळीबार केला. त्यात त्याचा सहकारी व तीन प्रवासी ठार झाले. ही घटना बी ५ कोचमध्ये घडली. रेल्वेने पालघर स्टेशन सोडल्यावर हा हल्ला झाला. दहिसर येथे आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शिताफीने अटक करण्यात आली. ठार झालेले चौघे मुंबईला येत होते.