मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशभरात 10 लाख नवीन सरकारी नोकरी देण्याचे उद्दिष्ट्य ठेवून सन 2022 पासून रोजगार मेळा सुरू केला आहे.त्या अंतर्गत आज 15 वा रोजगार मेळा असून मुंबई प्रमाणे देशभरात 47 ठिकाणी एकाच वेळी रोजगार मेळा चे आयोजन करण्यात आले आहे. व्हर्च्युअल पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या मेळाव्यास उपस्थित होते.
देशात नवतरुणाना सशक्त बनवून विकसित भारताचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.नवीन
रोजगार निर्मिती ला केंद्र सरकार ची प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.
मुंबईत रोजगार मेळ्यात तरुणांना सरकारी नोकरीचे नवनियुक्तीचे प्रमाणपत्र ना.रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी पोस्ट खाते; गृह मंत्रालय; महसूल; रेल मंत्रालय; उच्च शिक्षण आणि श्रम मंत्रालय आदी विभागात 446 युवकांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.