पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले स्टार प्रचारक

Santosh Gaikwad November 05, 2023 07:41 PM


मुंबई -  देशात सद्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम, तेलंगाना आणि छत्तीसगढ या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.  रामदास आठवले हे भाजपप्रणित एनडीएचे स्टार प्रचारक नेते ठरले आहेत.

छत्तीसगढ, मिझोरम आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाने सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. तर तेलगांना आणि राजस्थानमध्ये रिपब्लिकन पक्ष काही जागांवर स्वबळावर उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवणार आहे. उर्वरित जागांवर भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा राहील. अशी निवडणुक रणनिती ना. रामदास आठवले यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे छत्तीसगढ मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलगांना या राज्यात ना. रामदास आठवले यांच्या प्रचार सभांची मागणी वाढत आहे. भाजपचा मित्रपक्ष आणि दलित बहुजनांतुन पुढे आलेले सेलिब्रिटी लोकप्रिय राष्ट्रीय नेतृत्व म्हणून ना. रामदास आठवले यांच्या प्रचारसभांची पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मागणी वाढत आहे. पाच राज्यांच्या या निवडणुक रणधुमाळीत भाजपचे मित्र म्हणून ना. रामदास आठवले जनतेचे लक्ष वेधणारे स्टार प्रचारक ठरले आहेत.  


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खंबीर पाठीराखे मोदी सरकारच्या चांगल्या कामांची जोरदार मांडणी करणारे आणि कॉग्रेस आणि विरोधी पक्षांवर तुटुन पडणारे तसेच काव्यमय शैलीतुन वैशिष्टपुर्ण भाषण करणारे राष्ट्रीय नेते म्हणून ना. रामदास आठवले निवडणुक प्रचारसभांमध्ये आकर्षण बिंदु ठरले आहेत. विधानसभा निवडणुक अनेक उमेदवारांना आपल्या प्रचारसभांत ना. रामदास आठवले यांचे भाषण आवश्यक वाटु लागले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ना. रामदास आठवले स्टार प्रचारक नेते ठरले आहेत.  


 मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये ना. रामदास आठवले यांचे आतापर्यंत 3 निवडणुक प्रचार दौरे झाले आहे. छत्तीसगढमधील रायपुर आणि दुर्ग येथे प्रचारसभांना ना. रामदास आठवलेंनी संबोधीत केले आहे. येत्या दि. 6 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे, दि. 14 नोव्हेबर रोजी छत्तीसगढमधील रायपुर येथे तसेच दि. 17 नोव्हेंबर हैद्राबाद तेलगांना येथे आणि दि. 18 नोव्हेंबर राजस्थान मध्ये ना. रामदास आठवले हे विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभांना संबोधित करणार आहेत.