ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात : शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय

Santosh Gaikwad June 21, 2023 06:00 PM

 

मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे  पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सिक्युरिटी तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी होती. मात्र आता त्यांची सिक्युरिटीत कपात करण्यात आली आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत होते. मात्र आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. 


उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी केल्याची माहिती समोर येत आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे. मातोश्रीच्या सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे.