मुंबई, १८जुलै,२०२३: ग्राहक समाधानामध्ये वाढ करण्यासोबत संपन्न ब्रॅण्ड मालकीहक्क अनुभव देण्याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत रेनॉ इंडिया या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रॅण्डने देशव्यापी विक्री-पश्चात्त सेवा उपक्रम 'रेनॉ मान्सून कॅम्प'च्या शुभारंभाची घोषणा केली. भारतभरातील सर्व रेनॉल्ट डिलरशिप्समध्ये १७ जुलै ते २३ जुलै २०२३ पर्यंत मान्सून कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्सून कॅम्पचे आयोजन करण्यामागे वाहनांच्या सानुकूल कार्यक्षमतेची खात्री घेण्याचा प्रमुख उद्देश आहे, जे मान्सून सीझनदरम्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कॅम्प रेनॉ मालकांना रेनॉ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार कॉम्प्लीमेण्टरी कार चेक-अप सेवा देईल, ज्यामध्ये कारच्या सर्व प्रमुख फंक्शन्सची सविस्तर तपासणी करण्यात येईल. मान्सून सीझनदरम्यान सुरक्षित व समस्या-मुक्त ड्रायव्हिंगच्या खात्रीसाठी कुशल व पात्र सर्विस टेक्निशियन्न्स वाहनांची तपासणी करतील. अशा नियतकालिक तपासण्यांमधून कारच्या सुधारित कार्यक्षमतेसाठी आवश्यक कृतींची खात्री मिळते आणि ग्राहकांना समाधानकारक मालकीहक्क अनुभव मिळतो.
या उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त करत रेनॉ इंडियाच्या विक्री व विपणनाचे उपाध्यक्ष श्री. सुधीर मल्होत्रा म्हणाले, ''आम्हाला भारतभरातील आमच्या बहुमूल्य ग्राहकांसाठी 'रेनॉ मान्सून कॅम्प'च्या देशव्यापी लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. रेनॉमध्ये आम्ही ग्राहकांना समाधान मिळण्याची खात्री घेण्याला, तसेच अपवादात्मक ब्रॅण्ड मालकीहक्क अनुभव प्रदान करण्याला प्राधान्य देतो. मान्सून कॅम्पसह आमचा आव्हानात्मक मान्सून सीझनदरम्यान रेनॉ वेईकल्सची कार्यक्षमता व सुरक्षितता सानुकूल करण्याचा उद्देश आहे. आमच्या कुशल टेक्निशियन्सकडून करण्यात येणाऱ्या कॉम्प्लीमेण्टरी कार तपासणी, आकर्षक ऑफर्स आणि सर्वसमावेशक कृतींच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.''
आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान डिलरशिप्सना भेट देणारे ग्राहक आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतात, जसे निवडक पार्ट्सवर १० टक्के सूट, निवडक अॅक्सेसरीजवर जवळपास ५० टक्के सूट, तसेच मजूरीवर १५ टक्के सूट. याव्यतिरिक्त माय रेनॉ कस्टमर्सना (एमवायआर) देखील निवडक पार्टस् व अॅक्सेसरीजवर जवळपास ५ टक्क्यांची सूट, निवडक टायर ब्रॅण्ड्सवर स्पेशल ऑफर्स व कॉम्प्लीमेण्टरी कार टॉप वॉश मिळेल. रेनॉ इंडिया 'रेनॉ सेक्युअर' व 'रेनॉ असिस्ट'वर देखील १० टक्के सूट देईल, जे एक्स्टेण्डेड वॉरंटी व रोडसाइड असिस्टण्स देतात. सर्वसमावेशक कार तपासणी सुविधा व स्पेशल ऑफर्स व्यतिरिक्त ग्राहकांसाठी विविध धमाल उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येईल, ज्यामधून खात्रीने गिफ्ट्स मिळतील. ज्यामुळे हा कॅम्प त्यांच्यासाठी उत्साहवर्धक व संस्मरणीय अनुभव ठरेल.