शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय :
Santosh Gaikwad
May 02, 2023 03:04 PM
मुंबई : राष्ट्रवादी काँगेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवारांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ते भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले होते.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे होत आहे. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला . १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत. असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात चांगलेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यावेळी हा निर्णय मागे घ्यावा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
---