रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

Santosh Gaikwad May 26, 2024 04:41 PM


लातूर (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची कन्या रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून  निवड झाल्याबद्दल रिया आणि तिचे आई वडिल पल्लवी आणि विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.

पूज्यनीय भंते पाय्यानंद यांनी रियाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रिया ने आपले मनोगत व्यक्त केले. रिया म्हणाली की, परमपूज्यनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ शकले.माझ्या कुटुंबांनी मला सपोर्ट करुन पाठवले म्हणून हे शक्य झाले.आपण ही आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी देशात आणि परदेशात पाठवावे असे मत रिया ने व्यक्त केले.

कार्यक्रमाला अखिल भारतीय भिक्कू संघाचे कार्याध्यक्ष पुज्यनीय भंते डॉ उपगुप्त थेरो,पुज्यनीय भंते पाय्यानंद,,पुज्यनीय भिक्कू संघ,पांडुरंग अंबुलगेकर,प्राचार्य डॉ गवई,हजारोच्या संख्येनी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.