दृष्टी गमावण्याच्या दोन प्रमुख कारणांवर उपचार करण्यासाठी रॉशने डोळ्यासाठी पहिले आणि एकमेव द्विविशिष्ट मोनोक्लोनल अँटीबॉडी व्हॅबिस्मो® (फॅरिसिमॅब) लाँच केले

Santosh Sakpal March 07, 2024 08:44 PM

व्हॅबिस्मो दोन रोग मार्गांना लक्ष्य करते आणि प्रतिबंधित करते ज्यामुळे निओव्हॅस्क्युलर किंवा "वेट" वय-संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन (एनएएमडी) आणि डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) होते

व्हॅबिस्मोची क्रांतिकारी दुहेरी-मार्ग कृती यंत्रणा (एमओए) एनएएमडी आणि डीएमई ने पीडित रूग्णांसाठी रक्तवहिन्यासंबंधी स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी अँजिओपोएटिन - 2 (अँग -2) आणि संवहनी एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर -ए (व्हीईजीएफ-ए) निष्प्रभ करते

व्हॅबिस्मो हे एनएएमडी आणि डीएमई दोन्हीसाठी मंजूर केलेले एकमेव इंजेक्टेबल डोळ्याचे औषध आहे, ज्यात दर 16 आठवड्यांपर्यंत (4 महिन्यांतून एकदा) डोसचे कालांतर आहे. 


नवी दिल्ली, 05 मार्च 2024: रॉश फार्मा इंडियाने निओव्हॅस्क्युलर किंवा "वेट" वयाशी संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन (एनएएमडी) आणि डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) च्या उपचारांसाठी व्हॅबिस्मो® (फॅरिसिमॅब) लाँच करून नेत्रविज्ञान क्षेत्रात प्रवेश केला आहे. जगभरातील दृष्टी कमी होण्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे निओव्हॅस्क्युलर एएमडी आणि डीएमई आहेत. 


व्हॅबिस्मो® हा पहिला आणि एकमेव दुहेरी-मार्ग-अवरोधक आहे जो अनेक दृष्टीला धोका असणाऱ्या रेटिना परिस्थितीशी संबंधित दोन रोग मार्गांना विशिष्टरित्या लक्ष्य करून त्यांना रोखतो. हे अँजिओपोएटिन -2 (अँग -2) आणि संवहनी एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर -ए (व्हीईजीएफ-ए) या दोघांनाही निष्प्रभ करते जे रेटिना परिस्थिती निर्माण होण्यात व पुढे वाढत जाण्यात गुंतलेले मुख्य प्रथिने आहेत आणि हे डोळ्यातील रक्तवाहिन्या अस्थिर करतात व दृष्टी कमी करण्यात त्यांचा योगदान होतो.


जगातील पहिला द्विविशिष्ट मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणून, व्हॅबिस्मो हा एकच रेणू आहे जो दोन लक्ष्यांच्या प्रभावांना लक्ष्य करण्यासाठी व रोखण्यासाठी रचला गेला आहे. यामुळे एकामध्ये दोन औषधांचे फायदे मिळतात. सध्याचे उपचार पर्याय एकट्या व्हीईजीएफला लक्ष्य करतात आणि म्हणूनच रोगाच्या जीवशास्त्रास केवळ अंशतः संबोधित करतात. अँग -2 आणि व्हीईजीएफ -ए चा समावेश असलेले दोन्ही मार्गांमध्ये अडथळे निर्माण करून, व्हॅबिस्मो® लोकांना एनएएमडीसाठी 15 वर्षांहून अधिक आणि डीएमईसाठी सुमारे एक दशकानंतर पहिला नवीन एमओए (कृतीची यंत्रणा) प्रदान करत आहे. हे करून रेटिनामधील रक्तवाहिन्या स्थिर करते आणि दृष्टी परिणाम सुधारते. 


व्हॅबिस्मोमध्ये® सध्याच्या स्टँडर्ड ऑफ केअर (एसओसी) मध्ये बदल करण्याची क्षमता आहे कारण एनएएमडी आणि डीएमईसाठी सध्या उपलब्ध उपचार पर्यायांशी संबंधित ओझे, जसे की वारंवार डोळ्यांचे इंजेक्शन (सामान्यत: दर एक ते दोन महिन्यांनी द्यावे लागते) आणि डॉक्टरांच्या भेटी यांच्यामुळे कमी उपचार केले जातात आणि इष्टतम पेक्षा कमी दृष्टीच्या बाबतीत परिणाम मिळू शकतात. व्हॅबिस्मो® टिकाऊ उपचार प्रदान करते ज्यामुळे रूग्णांना चार महिन्यांतून एकदा डोळ्याच्या इंजेक्शनची gरज भासते आणि समान दृष्टीचे लाभ आणि शारीरिक सुधारणा साध्य करते.



रॉश फार्मा इंडियाचे सी.इ.ओ आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही सिम्पसन इमॅन्युएल म्हणाले, "रेटिनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी अधिक काही केले पाहिजे असे आम्हाला वाटते. मोतीबिंदू आणि इतर फ्रंटल नेत्र-विकारांसाठी तीव्र जागरूकता आणि कृती केली जात असताना, रेटिनाच्या स्थितीचे निदान बऱ्याचदा उशीरा होते किंवा दुर्लक्षित. असे केल्याने दृष्टी कमी होत जाते. व्हॅबिस्मोच्या® लाँच केल्यामुळे भारतातील नेत्रविज्ञान क्षेत्रात आमचा प्रवेश झाला असून, देशात सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण प्रयोग आणण्याची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. कालांतराने डोळ्यांच्या कमी इंजेक्शनसह, दृष्टी आणि शरीररचना सुधारताना आणि टिकवून ठेवताना, व्हॅबिस्मो® रुग्ण, त्यांची काळजी घेणारे आणि आरोग्य सेवा प्रणालींसाठी अधिक सोयीस्कर आणि प्रभावी उपचार वेळापत्रक प्रदान करते.


"एनएएमडी आणि डीएमई एखाद्या व्यक्तीची वाचण्याची, वाहन चालविण्याची आणि चेहरा ओळखण्याची क्षमता मर्यादित करू शकतात. रोग जसजसा वाढत जातो तसतसे साध्या दैनंदिन क्रिया देखील आव्हानात्मक होऊ शकतात. व्हॅबिस्मो® रुग्णांना 'नवीनतम' (जगातील पहिला दुहेरी मार्ग प्रतिबंध), 'जलद' (सर्वात जलद वाळविणारा आणि प्रभावी रोग नियंत्रण) आणि 'सर्वांत लांब' (4 महिन्यांपर्यंत विस्तारित टिकाऊपणा) उपचार पर्याय प्रदान करते, असे रॉश फार्मा इंडियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विराज सुवर्णा  यांनी सांगितले.


पद्मश्री, डॉ. एस. नटराजन, चीफ क्लिनिकल सर्व्हिसेस - आदित्य ज्योत आय हॉस्पिटल, चीफ ऑफ विट्रेटिनल सर्व्हिसेस - डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल म्हणाले, 'वयाशी संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन (एएमडी) आणि डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) यांचा सामना करणे ही मोठी आव्हाने आहेत. या दोन्ही परिस्थितीमुळे दृष्टीची मौल्यवान देणगी धोक्यात आली आहे, ज्याचा परिणाम जगभरातील कोट्यवधी लोकांना भोगावा लागलेला आहे. तथापि, लक्ष्यित थेरपी प्रदान करणारे क्रांतिकारी उपचार, व्हॅबिस्मोच्या आगमनाने, आमच्याकडे आता या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. व्हॅबिस्मोची अनोखी कृती यंत्रणा एएमडी आणि डीएमईमध्ये गुंतलेल्या मूलभूत पॅथॉलॉजिकल मार्गांना प्रतिबंधित करून आशा प्रदान करते, ज्यामुळे दृष्टी टिकून राहते आणि रुग्णांचे जीवनमान सुधारते."


प्रतिबंधित आणि उपचार करण्यायोग्य दृष्टी गमावणे ही जागतिक सार्वजनिक आरोग्याची वाढती चिंता आहे. जगभरात 1 बिलियन लोक दृष्टीदोषाने जगतात जे टाळता आले असते. रेटिनाची परिस्थिती आता पूर्वीपेक्षा जास्त लोकांना प्रभावित करत आहे. जागतिक स्तरावर ~300 मिलीयनहून अधिक रुग्ण आणि भारतात ~ 11 मिलियन रूग्ण रेटिना दृष्टी गमावण्याने ग्रस्त आहेत.  जगातील एक तृतीयांश अंध लोकसंख्या भारतात राहते. याशिवाय, भारतात एनएएमडी आणि डीएमईचे प्रमाण अंदाजे 4 मिलियन इतके आहे.


व्हॅबिस्मो® (फॅरिसिमॅब) ला यूएसएफडीएने जानेवारी 2022 मध्ये प्रथम मान्यता दिली होती. हे आज 90+ देशांमध्ये उपलब्ध आहे आणि आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 11