ठाणे/मुंबई: 'लिव्हिंग इट लार्ज' या भावनेचा उत्सव साजरा करत, सीयाग्रामच्या रॉयल स्टॅगने १ फेब्रुवारी ला ठाणे, मुंबई येथील आनंद नगरातल्या टीएमसी ग्राउंड येथे एका शानदार शोसह रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या आवृत्तीची सुरुवात केली. या पूर्वीच्या सादरीकरणावर अभूतपूर्व मात करीत यंदाचा संगीत महोत्सव आणि गेमिंग मनोरंजनाच्या सर्वोत्तम चमूने एकाच व्यासपीठावरील या सीमा वाढविल्या.
भारतातील काही प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो उत्साही तरुण एकत्र जमल्याने ही सायंकाळ अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाने काळजाचा ठाव घेणारे संगीत, मनमोहक सादरीकरण आणि अतुलनीय उर्जेने ही सायंकाळ अविस्मरणीय ठरली.
टीएमसी ठाण्याचे विस्तीर्ण मैदान तल्लीन कला प्रदर्शने, क्युरेटेड फूड एक्सपिरीयन्स आणि इंटरॅक्टिव्ह झोनने अक्षरशः जिवंत झाले. यातून संगीताव्यतिरिक्त एक बहु-संवेदी उत्सव निर्माण झाला. या अविस्मरणीय सायंकाळची सुरुवात डीजे योगी यांच्या रॉकिंग सेटने झाली. डीजे योगीने रात्रीसाठी परिपूर्ण वातावरण तयार केले. रॅप आयकॉन इक्काने त्यात आणखी जोश भरत एकाहून एक बीट्स सादर केले. त्यानंतर दमदार परफॉर्मर निकिता गांधी आणि तिच्या टीममधील बहुमुखी गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
ग्रँड फिनालेमध्ये संगीतकार अरमान मलिक यांनी एक शानदार समारोप सादर केला. जो विविध संगीत शैलींच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्रणाला परिपूर्णपणे मूर्त रूप देऊन गेला. या सादरीकरणाने नवी पिढी आणखी उत्साहाने चार्ज होत अविस्मरणीय अनुभव मिळवून गेली. या कार्यक्रमात श्रीमन लेजेंड आणि रॉकनी यांच्यातील रोमांचकारी ईएएफसी गेमिंग फेस-ऑफ स्पर्धा देखील स्टेजवर थेट दाखवण्यात आली.
गायक-गीतकार अरमान मलिक म्हणाले, "लोकांशी एकरूप होत संगीत हा नेहमीच माझ्यासाठी उत्तम मार्ग राहिला आहे. तुम्ही कुठून आलेले असाल, कोणतीही भाषा बोलत असला तरी संगित ही एकमेव भाषा तुम्हाला जोडते. गेल्या वर्षी देशभरात रॉयल स्टॅग बूमबॉक्ससाठी सादरीकरण करणे हा माझ्यासाठी देखील अविस्मरणीय अनुभव होता. प्रत्येक शहरातील गर्दीतून आलेली ऊर्जा खरोखरच उत्साहवर्धक आहे. मला अद्भुत लोकांना भेटण्याची, वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. संगीत हेच माध्यम सर्वांना एकत्र आणते हे प्रत्यक्ष पाहण्याची, अनुभवण्याची संधी देखील यातून मला मिळाली. मुंबईत झालेल्या एका अविश्वसनीय कार्यक्रमानंतर, गुरुग्राममध्ये हा अनोखा संगीत अनुभव देताना मी रोमांचित झालो आहे."
गायिका निकिता गांधी म्हणाली, "वैयक्तिकरित्या माझ्यासाठी, रॉयल स्टॅग बूमबॉक्स नेहमीच अभिनव प्रयोग आणि संगीताद्वारे सीमा ओलांडण्याचा अनुभव राहिला आहे. वेगवेगळ्या सादरीकरणातील शैलींचे मिश्रण किंवा लाईव्ह परफॉर्मन्स देणारे हे व्यासपीठ सर्जनशीलतेची मर्यादा ओलांडण्यास अनुमती देते. मुंबईतील रॉयल स्टॅग बूमबॉक्समध्ये सादरीकरण करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि मी गुवाहाटीमधील माझ्या पुढील कार्यक्रमासाठी उत्सुक आहे."
कलाकार इक्का म्हणाल्या, " प्रत्येक कलाकाराला त्यांचा अनोखा जादुई आवाज आणि उत्साह दाखवून देण्याची संधी देणे हे रॉयल स्टॅग बूम बॉक्सचे अनोखे आणि खास वैशिष्ट्य आहे. हे खरोखरच अनोखी कथा, थेट काळजाचा ठाव घेणारे बीट्स आणि अविस्मरणीय क्षणांचे मिश्रण आहे. मुंबईतील अभूतपूर्व सादरीकरणानंतर मी गुवाहाटीला तीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्यासाठी उत्साहित झालो आहे."
डीजे योगी म्हणाले, "रॉयल स्टॅग बूम बॉक्स हे संगीताद्वारे गर्दीत उत्साह पेरण्यात आणि त्यात जिवंतपणा आणण्यात मोलाचे व्यासपीठ आहे. बीट्स आणि शैलींचे मिश्रण करून एक उर्जा निर्माण करणारे वातावरण तयार करणे हे एक डीजे म्हणून, माझे कर्तव्य आहे. या वर्षी तीच उर्जा निर्माण करण्यात आणि कार्यक्रमाला एका भव्य अविस्मरणीय अनुभवात रूपांतरित करताना मी उत्साहित झालो आहे. उत्सागाला सुरुवात करून अविश्वसनीय कामगिरीसाठी लय सेट करणे हा माझ्यासाठी देखील एक परिपूर्ण थरार होता."
गेमिंग युट्यूबर श्रीमन लेजेनडी म्हणाला, "एक गेमर आणि निर्माता म्हणून, या अविश्वसनीय संधीसाठी अँपव्हर्स डीएमआय पल्ससोबत सहयोग करण्यास आणि रॉयल स्टॅग बूमबॉक्सचा भाग होण्यास मी खूप उत्सुक आहे. रॉयल स्टॅग बूमबॉक्समधील लाइव्ह गेमिंग फेस-ऑफने अनुभवाला एक रोमांचक आयाम दिला आहे. अशा उपक्रमांनी युवा-केंद्रित मनोरंजनाचे भविष्य सिद्ध होत आहे.
रॉकनी म्हणाले, "रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा आपल्याला उत्साहित करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उत्सव आहे. गेमिंग, संगीत आणि गर्दीची ऊर्जा. श्रीमन लेजेंडसोबत थेट स्पर्धा करणे महाकाव्य होते. उर्जा निर्माण करणारे वातावरण माझ्यासोबत कायमचे स्मरणात राहील."
पेर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आणि जागतिक व्यवसाय विकास प्रमुख कार्तिक मोहिंद्र म्हणाले, “संगीत ही सार्वत्रिक भाषा आहे. विशेषतः थेट सादरीकरणाद्वारे लोकांना एकत्र जोडून त्यांना अनोख्या जादूई क्षणांचा साक्षिदार अनुभव देण्यात हा कार्यक्रम उल्लेखनीय शक्ती देणारा आहे. रॉयल स्टॅग हे संगीताला त्याच्या युवा उत्कटतेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून साजरे करतो. आता, आम्ही रॉयल स्टॅग बूमबॉक्सच्या तिसऱ्या आवृत्तीचे अनावरण करत असताना, हे व्यासपीठ एका रोमांचक नवीन साउंडस्केपसह अनुभव उंचावण्यासाठी सज्ज आहे. ज्यामध्ये हिप-हॉपच्या धडधडणाऱ्या बीट्ससह बॉलीवूडच्या सुरांचे मिश्रण असेल. कला आणि सांस्कृतिक अनुभवांसह, लिव्हिंग इट लार्जच्या ब्रँड तत्वज्ञानाचे खरोखर उदाहरण दिले जाईल.”
ईएनआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यतीश मेहर्षी म्हणाले, “संगीताच्या जादूद्वारे लोकांना एकत्र जोडणे हे रॉयल स्टॅग बूमबॉक्सचे वैशिष्ट्य आहे. येथे नावीन्य संस्कृतीला भेटते आणि परंपरा आधुनिक वातावरणात अखंडपणे मिसळते. विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि अविस्मरणीय क्षण निर्माण करणाऱ्या अशा खास गोष्टीवर सहयोग करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ही आवृत्ती देशभरातील संगीत प्रेमींना आयुष्यभर जपून ठेवतील अशा ऊर्जा, आनंद आणि आठवणी प्रदान करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे.”