ही अराजकतेची सुरूवात : संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
Santosh Gaikwad
December 14, 2023 07:32 PM
नवी दिल्ली : नवीन संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत खासदार बसलेल्या बाकावर उडी घेऊन रंगीत धुराच्या नळकांडया फोडून आंदोलन केल्याचा प्रकार घडल्यानंतर संसदेच्या सुरक्षितेचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे.या धक्कादायक प्रकारानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, देशातील तरुण वैफल्यग्रस्त होऊन हल्ला करत असतील तर देशातील अराजकतेची सुरुवात असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्यादृष्टीने ही क्रांती आहे. आमच्यादृष्टीने ही अतिरेक आहे. हा चुकीचा मार्ग आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना दिशा देण्याचे काम करायला हवे. मोदी सरकारच्या योजना फेल आहे. आमच कोणालाही समर्थन नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले की, देशात सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब आहे. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे, हे लोकांना कळले असले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी का घुसले, म्यानमारचे अतिरेकी मणिपूरमध्ये कसे घुसले?, चीन हे अरुणाचल आणि लडाखमध्ये कसे घुसलेय हे जनतेला कळेल. सरकार केवळ भावनिक राजकारण करत असल्याची टीका राऊतांनी केली.
"ज्या तरुणांना पकडलं त्यांचा मार्ग चुकीचा होता पण त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं…" असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.