मुंबई, दि. २१ः मराठा आरक्षण संदर्भातील विधेयकावर मराठा समाज अस्वस्थ आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. सरकारचे मंत्री मात्र नाचण्यात दंग आहेत. नाचून हा प्रश्न सुटणार आहे का, असा संतप्त सवाल शिवसेना (ठाकरे) संजय राऊत यांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, पंजाबमधील शेतकरी आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनावरून समाचार घेतला.
राज्य सरकारने १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयकाचा मसूदा विशेष अधिवेशनात मंजूर केला. मराठ्यांना त्यानुसार सिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र आरक्षण दिले जाणार आहे. मराठा समाजाला हा निर्णय मान्य नाही. प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. सरकारने एकप्रकारे समाजाची फसवणूक केली, अशी भावना आहे. स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे सांगत सरकारने मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशात भाजप फसवाफसवीचे खेळ सुरू आहेत. मराठा आरक्षणापासून ते चंडीगड महापौर निवडणुकीपर्यंत हा पक्ष फसवाफसवीच्या पायावर उभा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील वरातीप्रमाणे रस्त्यावर नाचत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे, असे नाचून प्रश्न सुटणार का, असा प्रश्न राऊतांनी विचारला.
सरकारच्या तिजोरीत ठणठणाट