मुंबई,: एसबीआय जनरल इन्शुरन्स या भारतातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपनीने आर्थिक वर्ष २२-२३ साठी त्यांच्या आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीने प्रबळ विकासगाथा कायम ठेवत आर्थिक वर्ष २३ साठी १८४ कोटी रूपयांच्या नफ्याची नोंद केली, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने एकूण व्यवसायामध्ये देखील प्रबळ वाढ केली, जेथे ग्रॉस रिटन प्रीमियम (जीडब्ल्यूपी) गेल्या वर्षाच्या तुलनेत १७.६ टक्क्यांच्या वाढीसह १०,८८८ कोटी रूपयांवर पोहोचला.
सखोल पोहोच व डिजिटायझेशनवरील विश्वासाने संयोजित कंपनीच्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओने एबीआय जनरलला तिचा मार्केट शेअर ४.२१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मदत केली आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष २३ मध्ये २२ कोटींहून अधिक ग्राहकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. तसेच कंपनीने गृह, आरोग्य, वैयक्तिक अपघात, व्यावसायिक लाइन्स व पीक अशा विविध व्यवसाय श्रेणींमध्ये देखील प्रबळ वाढ केली आहे.
कंपनीने प्रबळ विकास वाढीची नोंद केली आणि करपूर्व नफा (पीबीटी) आर्थिक वर्ष २१-२२ मधील १७८ कोटी रूपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये २४४ कोटी रूपये राहिला. कंपनीचा सोल्व्हन्सी रेशो १.७२ होता, ज्यामधून कंपनीची प्रबळ आर्थिक स्थिती दिसून येते.
कंपनीच्या कामगिरीबाबत आपले मत व्यक्त करत एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किशोर कुमार पोलुदसू म्हणाले, ‘‘एसबीआय जनरलने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये स्थिर गतीने वाढ सुरू ठेवली आहे आणि फक्त १३ वर्षांच्या कार्यसंचालनांमध्ये १०,००० कोटी रूपयांचा जीडब्ल्यूपीचा बेंचमार्क पार करणाऱ्या पहिल्या सुरूवातीच्या कंपन्यांपैकी एक असण्याचा टप्पा गाठला आहे. कंपनीचा प्रबळ उत्पादन पोर्टफोलिओ, धोरणात्मक कॉर्पोरेट सहयोग, आरोग्य क्षेत्राचे लॉन्च आणि ग्राहक अनुभव संपन्न करण्यासाठी ग्राहक प्रवासाचे डिजिटायझेशन यामुळे हे यश मिळाले आहे. सर्वांकरिता विमा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशासह आम्ही सुलभ उत्पादने निर्माण करणे सुरूच ठेवू, जे मूल्याला चालना देतील आणि ग्राहकांचा आमच्या ब्रॅण्डवर असलेल्या विश्वासाचा फायदा घेतील.’’