उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेला ४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
Santosh Gaikwad
December 21, 2023 06:54 PM
मुंबई, दि.२१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले. मात्र नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.
देशातील एआयआयएमएस, आयआयएम, आयआयआयटी, एनआयटी, आयआयएससी, आयआयएसइआर इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती घटकातील विद्यार्थ्यांकरिता राज्य सरकार राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबवते. समाज कल्याण विभागाकडून १०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा केले जातात. त्यानुसार वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च, पुस्तकांसाठी ५ हजार आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे एकूण १० हजार रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ४ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्यानुसार अर्ज सांयकाळी ६.१५ वाजेपर्यंत पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयात जमा करावा. पदवी, पदव्युतर पदवी, पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी विशेषतः राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. योजनेचा अर्ज अधिक माहिती, जाहिरात, नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Santosh Sakpal
April 01, 2025
Santosh Sakpal
March 31, 2025
Santosh Sakpal
March 31, 2025
Santosh Sakpal
March 22, 2023
SANTOSH SAKPAL
April 16, 2023
Santosh Gaikwad
April 12, 2023