अर्का फिनकॅपच्या ३०,००० लाखांपर्यंतच्या सुरक्षित, पतमानांकन मिळविलेल्या, सूचीबद्ध, विमोचन करण्यायोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर - एनसीडी) सार्वजनिक विक्री

Santosh Sakpal December 05, 2023 11:21 PM

● मालिका VI साठी वार्षिक ९.९९ टक्क्यांपर्यंत प्रभावी परतावा

● पतमानांकन : क्रिसिल रेटिंग्स लिमिटेडद्वारे क्रिसिल एए-/सकारात्मक

● पहिल्या टप्प्यातील विक्री ७ डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि २० डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने किंवा मालमत्ता दायित्व समितीने ठरविल्यानुसार आणि संबंधित मंजुरींच्या अधीन राहून लवकर बंद करण्याच्या पर्यायासह बंद होईल.

● अपरिवर्तनीय रोख्यांचे व्यवहार डीमटेरियलाइज्ड स्वरूपात केले जातील

● प्रथम येणाऱ्यास, प्रथम लाभ या तत्त्वावर वाटप. तथापि, भरणा पूर्ण झाल्याच्या तारखेपासून आणि त्यानंतर आलेल्या अर्जदारांमध्ये मागणीच्या प्रमाणानुसार वाटप केले जाईल.

मुंबई, ५ डिसेंबर २०२३: अर्का फिनकॅप लिमिटेडने प्रत्येकी ₹ १,००० च्या दर्शनी मूल्याचे सुरक्षित, पतमानांकन मिळविलेल्या, सूचीबद्ध, विमोचन करण्यायोग्य अपरिवर्तनीय रोखे (नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर - एनसीडी) ₹ १५,००० लाखांच्या (“बेस इश्यू साइज") निधी उभारण्यासाठी सार्वजनिक विक्रीसाठी जारी केले आहेत. अधिक भरणा झाल्यास अतिरिक्त ₹ १५,००० लाखांचा निधी उभारण्याच्या (“ग्रीन शू ऑप्शन”) पर्यायासह, एकूण ₹ ३०,००० लाखांपर्यंत निधी उभारणी यातून केली जाईल.

या रोखे विक्रीचे प्रमुख व्यवस्थापक जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडेलवाइज सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) हे आहेत.

अर्का फिनकॅप लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. विमल भंडारी, म्हणाले, “आम्हाला या अपरिवर्तनीय रोख्यांचा पहिला टप्पा जारी करताना आनंद होत आहे. आम्‍ही किर्लोस्कर समूहाच्‍या व्‍यावसायिकरित्या व्‍यवस्‍थापित संस्‍थेचा एक भाग आहोत आणि प्रामुख्याने कॉर्पोरेट्स, रिअल इस्टेट आणि शहरी पायाभूत वित्तपुरवठा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना कर्जे आणि कर्जदारांना वैयक्तिकरित्या संरचित तसेच सुरक्षित मुदतीच्या वित्त पुरवठ्याचे उपाय प्रदान करण्‍यात गुंतलेले आहोत. आमच्या ग्राहकांवर आमचे लक्ष, अनुभवी व्यवस्थापन संघ आणि आमच्या मालमत्तेचे सजग निरीक्षण यामुळे, आर्थिक वर्ष २०१९ मध्ये आमच्या व्यवसायाचे कार्यान्वयन सुरू झाल्यापासून ते निरंतर वाढीचा अनुभव घेत आहे. आमचा विश्वास आहे की आमच्याकडे एक सुव्यवस्थित निधी स्रोत आहे जो आमच्या मजबूत तरलता व्यवस्थापन प्रणालीला, मजबूत क्रेडिट रेटिंग आणि ब्रँड इक्विटीला सुयोग्य आधार देतो. ताजी अपरिवर्तनीय रोख्यांची सार्वजनिक विक्री ही दायित्व विविधीकरणाच्या आमच्या धोरणाशी सुसंगतच आहे.

हे अपरिवर्तनीय रोखे त्रैमासिक आणि वार्षिक व्याज पर्यायासह ९.००% ते १०.००% वार्षिक व्याज दर (कूपन दर) प्रस्तुत करतात. हे अपरिवर्तनीय रोखे २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिने अशा तीन मुदत कालावधीचे आहेत. (कृपया एनसीडीच्या प्रत्येक मालिकेसाठी कूपन दर आणि मुदतीच्या रचनेसंबंधी तक्त्याला पाहावे) हे अपरिवर्तनीय रोखे मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध करणे प्रस्तावित आहे.

या पहिल्या टप्प्यातील रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५ टक्के निधी आगामी काळातील कर्ज, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य उद्यम उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजचे इश्यू आणि लिस्टिंग) विनियम, २०२१ (“सेबी एनसीएस विनियम”) चे पालन करून, पहिल्या टप्प्यातील रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी २५ टक्क्यांपेक्षा जास्त अशा वापराच्या अधीन राहणार नाही.

कूपन दर आणि मुदतीची रचना

 

मालिका

I

II

III

IV*

V

VI

व्याज प्रदानतेची वारंवारता

तिमाही

वार्षिक

तिमाही

वार्षिक

तिमाही

वार्षिक

किमान अर्ज रक्कम

 १०,००० (किमान १० रोखेसर्व मालिकांसाठी

त्यानंतर कमाल अर्ज

 ,००० (१ रोखा) या पटीत कमाल कितीही

रोख्यांचे दर्शनी मूल्यविक्री किंमत (/रोखे)

 ,०००

मुदत कालावधी

२४ महिने

२४ महिने

३६ महिने

३६ महिने

६० महिने

६० महिने

कूपन दर (% प्रतिवर्ष) सर्व श्रेणीतील रोखे धारकांसाठी

.००%

.३०%

.३०%

.६५%

.६५%

१०.००%

प्रभावी परतावा (% प्रतिवर्ष) सर्व श्रेणीतील रोखे धारकांसाठी

.२९%

.२९%

.६२%

.६४%

.९९%

.९९%

व्याज प्रदानतेची पद्धत

सध्या उपलब्ध विविध पद्धतींद्वारे

सर्व श्रेणीतील रोखे धारकांसाठी मुदतपूर्ती समयी विमोचनीय रक्कम (/रोखे)

 ,०००

 ,०००

 ,०००

 ,०००

 ,०००

 ,०००

मुदतपूर्ती/ विमोचन तारीख (वाटपाच्या तारखेपासून)

२४ महिने

२४ महिने

३६ महिने

३६ महिने

६० महिने

६० महिने

पुट आणि कॉल ऑप्शन

अनुपलब्ध

ज्या अर्जदारांनी संबंधित अपरिवर्तनीय रोख्यांच्या मालिकेची निवड सूचित केलेली नाही त्यांना कंपनी मालिका IV च्या (वार्षिक पर्याय) अपरिवर्तनी रोख्यांचे वाटप करेल.