इंडेल मनी लिमिटेडकडून २०० कोटी रुपयांपर्यंत सुरक्षित, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्री
Santosh Sakpal
January 18, 2024 08:47 PM
प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याचे सुरक्षित अपरिवर्तनीय रोखे- एनसीडी
रोखेविक्रीत १०० कोटी रुपयांच्या रकमेसाठी बेस इश्यूचा समावेश आणि अतिरिक्त भरणा झाल्यास आणखी १०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी राखून ठेवण्याचा पर्याय असलेली अशी एकूण २०० कोटी रुपयांपर्यंतची रोखेविक्री
रोखे विक्री मंगळवार, ३० जानेवारी २०२४ रोजी खुली होईल आणि सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी बंद होईल
७२ महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करणारा - पर्याय आठवा
वार्षिक १२.२५ टक्क्यांपर्यंत परतावा देणारा व्याज (कूपन) दर
३६६ दिवसांपासून ते ७२ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसह सुरक्षित एनसीडी
एनसीडीच्या सर्व पर्यायांमध्ये किमान अर्जाचा आकार १० एनसीडी (१०,००० रु.)
मुंबई, १७ जानेवारी २०२४: इंडेल मनी लिमिटेड, सोने तारण कर्ज क्षेत्रातील वेगाने वाढ साधत असलेल्या बँकेतर वित्तीय कंपन्यांपैकी एक प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) चौथी सार्वजनिक विक्री प्रस्तावित केली आहे. रोखे विक्री मंगळवार, ३० जानेवारी २०२४ रोजी खुली होईल आणि सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी (भरणा लवकर पूर्ण झाल्यास लवकर बंद करण्याच्या पर्यायासह) बंद होईल.
इंडेल मनी लिमिटेडचे कार्यकारी पूर्णवेळ संचालक श्री. उमेश मोहनन म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंतच्या कालावधीत नफ्यात तब्बल १३ पटींनी वाढ साधणारी भारतातील सोने तारण क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी बँकेतर वित्तीय कंपन्यांपैकी एक असल्याने, आम्ही परिचालन खर्चाच्या कार्यक्षम वापरावर आणि शाखानिहाय उत्पादकता वाढवण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही चालू आर्थिक वर्षातील ३० सप्टेंबर २०२३ रोजी समाप्त कालावधीत व्यवस्थापनयोग्य मालमत्तेत (एयूएम) दमदार वाढ केली आहे. भारतात दीर्घकालीन सोने तारण कर्ज योजना प्रस्तुत करणार्या काही गोल्ड लोन कंपन्यांपैकी एक असल्याने, आमच्या शाखा जाळ्याचा विस्तार करून कर्ज वितरण वाढवणे आणि त्याच बरोबरीने महसूल, नफा आणि दृश्यमानता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. प्रस्तावित एनसीडी विक्री आम्हाला आमची कर्जे आणि गुंतवणूकदारांच्या मिश्रणात विविधता आणण्यास निश्चितच मदत करेल.”
मूळ आकारमान १०० कोटी रुपये (बेस इश्यू) असलेल्या या रोखे विक्रीत, अतिरिक्त भरणा झाल्यास (ओव्हर सबस्क्रिप्शन) आणखी १०० कोटी रुपयांपर्यंत निधी राखून ठेवण्याचा पर्याय असल्याने ही एकूण २०० कोटी रुपयांपर्यंतची रोखे विक्री आहे. रोखे विक्रीची प्रमुख व्यवस्थापक व्हिवरो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे.
या रोखे विक्रीद्वारे जमा केलेला निधी आगामी कर्ज व्यवसाय, वित्तपुरवठा आणि कंपनीने उचललेल्या कर्जावरील मुद्दल आणि व्याजाची परतफेड/ मुदतपूर्व फेड यासाठी वापरला जाईल.
इंडेल मनी लिमिटेडकडील एकूण व्यवस्थापनयोग्य मालमत्ता- एयूएम (ऑफ बॅलन्स शीट मालमत्ता वगळून) ३१ मार्च २०२३ अखेर असलेल्या ६४,७६८.५३ लाख रुपयांच्या तुलनेत, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ८१,७४०.८६ लाख रुपयांवर गेली आहे. कंपनीच्या कर्ज व्यवसायात सोने तारण कर्जाची हिस्सेदारी ८२ टक्क्यांपर्यंत आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २५० शाखांच्या शाखा जाळ्यासह कंपनीचे कामकाज सुरू आहे. भौगोलिक पदचिन्हे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १२ भारतीय राज्यांमधील ४२५ शाखांपर्यंत विस्तारण्याचा इंडेल मनी लिमिटेडचा मानस आहे, मुख्यतः भारतातील पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हा शाखा विस्तार सुरू आहे.
इंडेल मनी लिमिटेडने या आधी अपरिवर्तन रोख्यांची तीन वेळा सार्वजनिक विक्री यशस्वीपणे राबवली असून, त्यायोगे २६० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे.