महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने : शरद पवार

Santosh Gaikwad June 04, 2024 03:55 PM



मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असून परिवर्तनाला पोषक असा निकाल लागला आहे असे शरद पवार म्हणाले. 

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवल्याने महाराष्ट्राच्या जनतेचे आणि कार्यकत्यांचे आभार. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे एकटयाचे यश नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादीत जागा लढविल्या होत्या मात्र काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रीतपणे निवडणूक लढविल्याने यश मिळालं आहे. आम्ही सात जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. १० पैकी  ७ जागांवर आघाडीवर आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगलं मिळालं. आम्ही जीवाभावाप्रमाणे लढल्याचे  पवार म्हणाले. 

देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले आहेत. तिथल्या जनतेने वेगळा निकाल दिला.  यापूर्वी भाजपला उत्तरप्रदेशमध्ये यश मिळायचे याचे मार्जीन मोठं असायचं मात्र आता मर्यादीत मार्जिन मिळालं आहे.  आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली काँग्रेसचे मल्लिकाजुर्न खर्गे सीताराम येचुरी यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. आज संध्याकाळी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर  उद्या दिल्लीत बैठक होणार आहे त्यासाठी आम्ही जाऊ असे शरद पवार म्हणाले. 
----------