शेलने अपग्रेडेड पोर्टफोलिओ आणला बाजारात, शाहीद कपूरच्या साथीने नवीन मर्यादित आवृत्ती झाली लाँच

Santosh Sakpal April 12, 2024 05:29 PM

MUMBAI : शेल लुब्रिकंट्स इंडियाने शेल अ‍ॅडव्हान्स्ड  मोटरसायकल ऑइल ची अपग्रेडेड मर्यादित आवृत्ती बाजारात आणली आहे. त्यामुळे ग्राहकांचा वाहनं चालवण्याच्या अनुभवाला आधुनिक साज येणार आहे. कंपनीने अपग्रेडेड पोर्टफोलिओ मर्यादित स्वरुपात बाजारात आणला असून त्याचा ब्रँड अँम्बिसिडर शाहीद कपूर असून ‘रुकना मुश्किल है’ या ब्रँड कॅम्पेनसाठी त्याचा सहभाग कायम ठेवला आहे. २०२३ मध्ये हे कॅम्पेन सादर करण्यात आलं होतं. यातून शेल अ‍ॅडव्हान्स्ड इंजिन ऑइल बरोबरच भारतीय वाहनचालकांची आवड, जिद्द, निश्चय आशा, दिसते.

नवीन शेल अ‍ॅडव्हान्स AX७ सिथेंटिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना गाडी चालवणे आणखी सुलभ होते. तसंच फ्लेक्सी मॉलिक्युल टेक्नॉलॉजीमुळे इंजिनातून चाकांमध्ये होत असलेले पॉवर ट्रान्स्फरचे कार्य अतिशय प्रभावीपणे होते. अपग्रेडेड शेल अ‍ॅडव्हान्स AX५ प्रिमिअम मिनरल ऑइल मध्ये अॅडव्हान्स्ड क्लिन्सिंग टेक्नॉलॉजी आणि काही अतिरिक्त वैशिष्ट्यं आहेत त्यामुळे गाडी विनासायास सुरू होते आणि इंजिनचं आयुष्य सुधारतं.

शेलच्या या नवीन रेंजबद्दल शेल लुब्रिकंट्स इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अमित घुगरे म्हणाले, “आमच्यासाठी ‘रुकना मुश्किल है’ हे फक्त इमोशन नाही तर वाहनचालकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव येण्यासाठी आणि त्यांना कोणी खरोखरच थांबवू शकत नाही ही भावना प्रबळ करणारं व्यासपीठ आहे. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही शाहीद कपूरची मदत घेतली. आता आम्ही पोर्टफोलिओ अपग्रेड करून आणखी एक पाऊल उचलले आणि त्याचा ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे. आमच्या स्पेशल एडिशन पॅकमुळे शेल इंजिन ऑइल्सच्या साथीने अधिकाधिक ग्राहक त्यांची आवड जोपासतील अशी आम्हाला आशा आहे.”

या रेंजचं उद्घाटन करताना शेल लुब्रिकंट्स इंडियाचा ब्रँड अम्बिसिडर शाहीद कपूर म्हणाला, “शेल अ‍ॅडव्हान्सच्या अपग्रेडेड पोर्टफोलिओसाठी काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या पोर्टफोलिओमुळे इंजिनचं आयुष्य तर वाढेलच पण वाहनं चालवण्याचा अनुभवही आनंददायी होईल. ही नवीन उत्पादनं वापरून आता आम्ही देशभर भटकणार आहोत त्यामुळे ‘रुकना मुश्किल है’ हे आमचं घोषवाक्य सार्थ ठरणार आहे. शेल अ‍ॅडव्हान्स्डचा स्पेशल एडिशन पॅक घ्या आणि माझ्याबरोबर या रंजक प्रवासात सहभागी व्हा.”

उत्पादनांची ही नवी रेंज शेल अ‍ॅडव्हान्सड वर्कशॉप आणि भारतातील सर्व रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल.